elephant playing

सध्या एका हत्तीच्या पिल्लाचा व्हिडिओ खूप व्हायरल(Elephant`s Video Viral) झाला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी चांगलेच खुश झाले आहेत. 

    सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल(Viral Video) होत असतात. व्हिडीओंमधील प्राण्यांनी तसेच पक्ष्यांनी केलेल्या करामती, खोड्या पाहून आपल्याला हसू फुटते. याच कारणामुळे हे व्हिडिओ चर्चेचा विषय असतात. सध्या एका हत्तीच्या पिल्लाचा व्हिडिओ खूप व्हायरल(Elephant`s Video Viral) झाला आहे. हा व्हिडिओ पाहून नेटकरी चांगलेच खुश झाले आहेत.

    सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ हा अतिशय मजेदार आहे. या व्हिडिओमध्ये एक हत्तीचं पिल्लू दिसत आहे. हे पिल्लू अतिशय गोंडस दिसत असून ते पाण्यासोबत मजेत खेळत आहे. व्हिडिओमध्ये एक पाईपलाईन फुटल्याचे दिसते आहे. पाईपलाईन फुटल्यामुळे त्यातून पाणी बाहेर येत आहे. हेच बाहेर आलेले पाणी तुषारासारखे वाटत आहे. ऊन तापलेले असताना हे अंगावर पडणारे पाणी हत्तीच्या पिल्लाला हवेहवेसे वाटते आहे.

    हत्तीचे पिल्लू पाण्यात मनसोक्तपणे खेळत आहे. हे पिल्लू आपल्या सोंडेने फुटलेल्या पाईपलाईनशी खेळत आहे. तसेच बाहेर येणाऱ्या पाण्याच्या तुषारामध्ये स्वत: चे अंग भिजवून घेत आहे. हत्तीचे पिल्लू पाण्यात मस्तपैकी खेळत आहे.
    हा व्हिडीओ पाहून नेटकरी चांगलेच खुश झाले आहे. अनेकांनी या व्हिडीओवर मजेदार कमेंट्स केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी या व्हिडीओला रिट्विट करुन मजेदार कॅप्शन दिले आहे. Elephant Nature Park या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.