मध्यप्रदेशचे उर्जा मंत्री प्रद्युम्न सिंह तोमर
मध्यप्रदेशचे उर्जा मंत्री प्रद्युम्न सिंह तोमर

मध्यप्रदेशचे उर्जा मंत्री प्रद्युम्न सिंह तोमर यांना उशीर झाल्याने शुक्रवारी रेल्वे सुटली. दरम्यान त्यांनी मक्सी येथील विद्युत विभागाच्या सब स्टेशनमध्ये जाऊन पाहणी केली. यावेळी कर्मचाऱ्यांनी त्यांना कमी वेतन मिळत असल्याचे सांगत तक्रारींचा पाठाच वाचल्याने मंत्रीमहोदय हैरान झाले. यानंतर समस्या तत्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन उर्जामंत्र्यांनी दिले. अचानक कार्यालयामध्ये मंत्रीमहोदय आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती. मात्र मंत्र्यांनी सर्वांशी अतिशय सौहार्दपूर्ण चर्चा करीत समस्या जाणून घेतल्या.

इंदौर (INdour). मध्यप्रदेशचे उर्जा मंत्री प्रद्युम्न सिंह तोमर यांना उशीर झाल्याने शुक्रवारी रेल्वे सुटली. दरम्यान त्यांनी मक्सी येथील विद्युत विभागाच्या सब स्टेशनमध्ये जाऊन पाहणी केली. यावेळी कर्मचाऱ्यांनी त्यांना कमी वेतन मिळत असल्याचे सांगत तक्रारींचा पाठाच वाचल्याने मंत्रीमहोदय हैरान झाले. यानंतर समस्या तत्काळ मार्गी लावण्याचे आश्वासन उर्जामंत्र्यांनी दिले. अचानक कार्यालयामध्ये मंत्रीमहोदय आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती. मात्र मंत्र्यांनी सर्वांशी अतिशय सौहार्दपूर्ण चर्चा करीत समस्या जाणून घेतल्या.

उशीर झाल्याने सुटली रेलवे
मंत्री तोमर लग्न समारंभामध्ये इंदोरला आले होते. येथून त्यांना इंटरसिटी एक्स्प्रेसने ग्वालियरला परत जायचे होते. परंतु स्थानकावर जाण्यास उशीर झाल्याने गाडी सुटली. यानंतर ते गाडी पकडण्यासाठी शाजापूर जिल्ह्यातील मक्सी येथे गेले. दरम्यान त्यांचे लक्ष विद्युत विभागाच्या 132 केवी सब स्टेशनवर गेल्याने ते अचानक कार्यालयात दाखल झाले होते.

कामाबद्दल घेतली माहिती
मंत्री तोमर यांनी येथील विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून सब स्टेशनमध्ये सुरू असलेल्या कामाची माहिती जाणून घेतली. यावेळी कर्मचाऱ्यांनी सब स्टेशनमधील समस्यांचा पाढाच वाचला. उर्जामंत्र्यांनी सबस्टेशनची पाहणी करीत सर्व समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले.