bracelate for social distancing

मेरठमधील एका विद्यार्थ्यानं एक खास ब्रेसलेट बनवल आहे. हे ब्रेसलेट सोशल डिस्टन्सचं पालन करण्यासाठी मदत(brace late for social distancing)  करू शकतं, असा दावा त्यानं केलं आहे.

    मेरठ : कोरोना (corona)विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन वाढवला आहे. इतर अनेक राज्यांमध्येही लॉकडाऊन घोषित झाला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क घालण्याचा सल्ला वारंवार दिला जात आहे. गर्दीच्या ठिकाणी अनेकदा सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात नाही. हीच अडचण ओळखून मेरठमधील एका विद्यार्थ्यानं एक खास ब्रेसलेट बनवल आहे. हे ब्रेसलेट सोशल डिस्टन्सचं पालन करण्यासाठी मदत(brace late for social distancing)  करू शकतं, असा दावा त्यानं केलं आहे.

    नीरज उपाध्याय असं या ब्रेसलेट तयार करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. हे ब्रेसलेट घातलेल्या दोन व्यक्ती जेव्हा ठराविक अंतरापेक्षा जास्त एकमेकांच्या जवळ जातील, तेव्हा त्यांना करंट म्हणजेच विजेचा झटका लागेल. हा झटका लागल्यानंतर ते आपोआप एकमेकांपासून दूर होतील आणि सोशल डिस्टन्स पाळतील. मात्र,जेव्हा जास्त लोक याब्रेसलेटचा वापर करतील तेव्हाच हे काम करेल आणि लोकांना ते हातात घालून ठेवावं लागेल.

    नीरजने त्याच्या एका मित्राच्या मदतीनेयाचा डेमो प्रदर्शित केला आहे. हे दोघे जेव्हा तीन मीटर अंतरापेक्षा जास्त जवळ आले तेव्हा त्यांना विजेचा करंट बसला. नीरजला या खास डिव्हाईसचं पेटंट घ्यायचं आहे. हे ब्रेसलेट तयार करण्यासाठी त्याला १३० रुपयांचा खर्च आला आहे. उत्पादन वाढवायचं असल्यास किंमत आणखी कमी होईल,असं नीरज सांगतो.