इंग्लंडच्या बॅटिंगला सुरुवात, विजयासाठी १२५ धावांचे आव्हान

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला टी 20 सामना (India vs England 2021 1st T20) खेळला जात आहे. इंग्लंडच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. इंग्लंडकडून जेसन रॉय आणि जॉस बटलर ही सलामी जोडी मैदानात खेळत आहे. टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 125 धावांचे आव्हान दिले आहे.

    अहमदाबाद (Ahmedabad). टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पहिला टी 20 सामना (India vs England 2021 1st T20) खेळला जात आहे. इंग्लंडच्या बॅटिंगला सुरुवात झाली आहे. इंग्लंडकडून जेसन रॉय आणि जॉस बटलर ही सलामी जोडी मैदानात खेळत आहे. टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 125 धावांचे आव्हान दिले आहे.

    भारताने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 124 धावा केल्या. भारताकडून श्रेयस अय्यरने 48 चेंडूत 67 धावा केल्या. यामध्ये त्याने 8 चौकार आणि 1 षटकार लगावला. त्याशिवाय रिषभ पंतने 21 तर हार्दिक पांड्याने 19 धावांची खेळी केली. तर इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

    स्टेडियममध्ये ५० टक्के प्रेक्षकांना परवानगी
    या टी 20 मालिकेतील सर्व म्हणजेच 5 सामने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुजरात क्रिकेट असोसिएशनने स्टेडियममध्ये फक्त 50 टक्के क्रिकेट चाहत्यांनाच परवानगी दिली आहे.