प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

झारखंडमधील बडकागांव विधानसभा मतदारसंघाच्या आमदार अंबा प्रसाद यांनी आज थेट घोड्यावरुन विधानसभा परिसरात रॉयल एन्ट्री केली. निमित्त होतं जागतिक महिला दिन. महाराष्ट्राप्रमाणेच झारखंड विधीमंडळाचंही अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. त्यावेळी आमदार अंबा प्रसाद यांनी थेट घोड्यावर बसून विधानसभा परिसरात प्रवेश केला.

    रांची (Ranchi).  झारखंडमधील बडकागांव विधानसभा मतदारसंघाच्या आमदार अंबा प्रसाद यांनी आज थेट घोड्यावरुन विधानसभा परिसरात रॉयल एन्ट्री केली. निमित्त होतं जागतिक महिला दिन. महाराष्ट्राप्रमाणेच झारखंड विधीमंडळाचंही अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. त्यावेळी आमदार अंबा प्रसाद यांनी थेट घोड्यावर बसून विधानसभा परिसरात प्रवेश केला. महिला दिनानिमित्त अंबा प्रसाद यांनी ही एण्ट्री दिवसभर चर्चेचा विषय ठरली.

    आमदार अंबा प्रसाद या झारखंडमधील माजी मंत्री योगेंद्र साव यांच्या कन्या आहेत. आमदार झाल्यानंतर अंबा या विविध कारणांमुळे कायम चर्चेत असतात. यापूर्वीही त्यांनी विधानसभा परिसरात सायकल चालवत प्रवेश केला होता. अंबा प्रसाद यांनी महिला दिनी विधानसभा परिसरात फक्त घोड्यावरुन प्रवेशच केला नाही. तर त्यांनी महिलांसाठी एक खास भेटही दिली आहे.

    अंबा फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी काम सुरु केलं आहे. त्याचीच माहिती त्यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. “जागतिक महिला दिनानिमित्त समस्त महिलांना शुभेच्छा. या प्रसंगी अंबा फाऊंडेशनच्या पहिल्या प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आहे. त्यात 115 गरीब विधवा महिलांना स्थानिक रोजगार आणि 9 हजार रुपये प्रति महिना सुनिश्चित करण्यात आला आहे. कालांतराने यातून युवा, महिला आणि स्थानिक नागरिकांना जोडलं जाणार आहे”, असं ट्वीट अंबा प्रसाद यांनी केलं आहे.