tea lover

चहाचं वेड असणाऱ्यांचे अनेक व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर(Viral Video of Tea Lovers) बघितले असतील पण सध्या एक चहाप्रेमी माणसाचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.

    जगामध्ये अनेक लोकांना चहाचे वेड (Tea Lovers)आहे. चहाचे चाहते असलेले लोक प्रत्येक ऋतूमध्ये चहा पिणे पसंत करतात.चहाचं वेड असणाऱ्यांचे अनेक व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर(Viral Video of Tea Lovers) बघितले असतील पण सध्या एक चहाप्रेमी माणसाचा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हालाही हसू येईल.आयपीएस ऑफिसर अंकिता शर्मा यांनी एक व्हिडिओ त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे.


    या व्हिडिओ शेअर करत त्यांनी या फोटोला ‘ये हम है, ये हमारी चाय है,बाकी बाद मे देखेंगे’असं कॅप्शन दिलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की २ माणसांच्या हातामध्ये चहाचा कप आहे. पोलीस या दोघांना पकडून नेत आहेत. मात्र पोलीस नेत असतानाही त्या दोघांनी आपल्या चहाचा ग्लास सोडलेला नाही. चहाचा एकही थेंब न सांडवता ते पोलिसांसोबत जाऊन गाडीत बसले.


    हा व्हिडिओ बघून अनेकांनी या चहाच्या शौकीन लोकांबाबत आश्चर्य व्यक्त केलं आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत १० हजार लाईक्स मिळाले आहेत.