माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंह यांचे निधन

काही दिवसांपूर्वी रघुवंश प्रसाद सिंह यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना दिल्लीमधील एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र २ दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती आणखी बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. मात्र आज त्यांचे निधन झाले.

माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंह(raghuvansh prasad singh) यांचे आज निधन(death) झाले आहे. ते ७४ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यांच्यावर एम्स रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. त्यांच्या निधनानंतर लालू प्रसाद यादव यांनी ट्विटरवर आपला शोक व्यक्त केला आहे. रघुवंश प्रसाद सिंह यांनी २ दिवसांपुर्वीच राजदचा राजीनामा दिला होता.

काही दिवसांपूर्वी रघुवंश प्रसाद सिंह यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना दिल्लीमधील एम्स रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते. मात्र २ दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती आणखी बिघडल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. मात्र आज त्यांचे निधन झाले.

रघुवंश प्रसाद यांच्या निधनामुळे बिहारमधील राजकीय वर्तुळामध्ये शोककळा पसरली आहे. राजदचे नेते लालू प्रसाद यादव यांनी रघुवंश प्रसाद सिंह यांच्या निधनानंतर एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, प्रिय रघुवंश बाबू आपण हे काय कलं? परवाच मी तुम्हाला म्हणालो की तुम्ही कुठेही जाणार नाही. मात्र तुम्ही आता खूप दूर निघून गेला आहात. नि:शब्द झालो आहे. दु:खी झालो आहे. तुमची खूप आठवण येईल.

रघुवंश प्रसाद सिंह हे गेल्या ३२ वर्षांपासून राजदमध्ये होते. त्यांनी आयसीयूमध्ये असतानाच २ दिवसांपूर्वी पक्षाचा राजीनामा दिला होता. राजदमध्ये रघुवंश प्रसाद सिंह यांच्या सल्ल्यानुसार अनेक निर्णय घेतले जायचे.