Covacin is more expensive than Covishield; Bharat Biotech's covacin rates are now fixed following Serum Institute's covshield

बढनी या जिल्हा प्राथमिक आरोग्य केंद्रात ही घटना घडली. तेथील जवळपासच्या दोन गावातील 20 जणांना कोविशिल्डचा पहिला डोस देण्यात आला होता. 14 मे रोजी दुसरा डोस घेण्यासाठी हे सर्वजण आले होते. त्यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांना कोवॅक्सिनचा दुसरा डोस दिला. या घटनेची माहिती कळताच तेथील आरोग्य विभागात जोरदार खळबळ उडाली. सर्वजण एकमेकांवर आरोप करू लागले.

    लखनौ : उत्तर प्रदेशच्या सिद्धार्थनगर जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहीम राबविली जात आहे. यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांकडून झालेल्या निष्काळजीपणामुळे एक धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. ज्या लोकांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोस देण्यात आला होता, त्यांना दुसरा डोस कोवॅक्सिनचा देण्यात आला आहे.

    बढनी या जिल्हा प्राथमिक आरोग्य केंद्रात ही घटना घडली. तेथील जवळपासच्या दोन गावातील 20 जणांना कोविशिल्डचा पहिला डोस देण्यात आला होता. 14 मे रोजी दुसरा डोस घेण्यासाठी हे सर्वजण आले होते. त्यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्यांना कोवॅक्सिनचा दुसरा डोस दिला. या घटनेची माहिती कळताच तेथील आरोग्य विभागात जोरदार खळबळ उडाली. सर्वजण एकमेकांवर आरोप करू लागले.

    जेव्हा ही गोष्ट लस घेतलेल्या नागरिकांना समजली, तेव्हा त्यांनाही घाम फुटला होता. कॉकटेल वॅक्सिन घेतल्यानंतरही एकाही व्यक्तीला आरोग्याच्या तक्रारी जाणवल्या नाहीत, पण सर्वजण घाबरलेले आहेत. हा निष्काळजीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यासाठी एका पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. अहवाल सादर होताच दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे आरोग्य अधिकारी चौधरी यांनी सांगितले.