दुष्यंत चौटाला- मुख्यमंत्री, हरियाणा
दुष्यंत चौटाला- मुख्यमंत्री, हरियाणा

हरियाणा, पंजाबसह इतर राज्यातील शेतकऱ्यांनी कृषी कायद्याविरुद्ध दिल्लीत उभारलेल्या शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय मंत्री आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. यातून समाधानकारक तोडगा निघेल आणि आंदोलन थांबेल अशी अपेक्षा हरियाणाचे मुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी केली आहे. याबाबत एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत चौटाला यांनी आपले चर्चेतून निर्णायक निकाल लागेल असे म्हटले आहे.

चंडिगढ (Chandigadh).  हरियाणा, पंजाबसह इतर राज्यातील शेतकऱ्यांनी कृषी कायद्याविरुद्ध दिल्लीत उभारलेल्या शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय मंत्री आणि शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे. यातून समाधानकारक तोडगा निघेल आणि आंदोलन थांबेल अशी अपेक्षा हरियाणाचे मुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी केली आहे. याबाबत एएनआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत चौटाला यांनी आपले चर्चेतून निर्णायक निकाल लागेल असे म्हटले आहे.

एएनआयने केलेल्या ट्विटमध्ये चौटाला म्हणताहेत, ‘केंद्र ज्या मार्गाने वाटाघाटी करीत आहे, त्यांनाही या समस्येवर तोडगा हवा आहे. मी आशा करतो की, 24 ते 48 तासांत केंद्र शासन आणि शेतकऱ्यांमध्ये शेवटची चर्चा होईल. यातून निर्णायक निकाल लागेल.’