Fairies descended directly from heaven to save the world from the corona; Storm crowd for darshan

    भोपाळ : परिकथेच्या पऱ्या होऊनी खऱ्या उतरल्या चंद्रावरुनी… ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातील या गीताला साजेशा असा प्रकार मध्य प्रदेशातील राजगड मध्ये घडला आहे. कोरोनापासून जगाला वाचवण्यासाठी डायरेक्ट स्वर्गातून दोन पऱ्या अवतरल्या असल्याची वर्ता शहरभर पसरली. मग, पऱ्यांच्या दर्शनासाठी आणि त्यांचा आशिर्वाद घेण्यासाठी नागरीकांची तुफान गर्दी झाली.

    मागील दीड वर्षापासून देशात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाने लाखो लोकांचा बळी घेतला आहे. मात्र, कोरोनावर अद्याप ठोस असे औषध सापडलेले नाही. त्यातच आता कोरोना लशीमुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे कोरोनापासून बचाव करण्यासाठी अंधविश्वासारख्या अफवांवर विश्वास ठेवला जात आहे. यामुळे कोरोनाच फैलाव वाढत आहे.

    कोरोनापासून जगाला वाचवण्यासाठी दोन पऱ्या अवतरल्या आहेत, अशी अफवा मध्य प्रदेशमधील राजगड येथील चाटूखेडा गावामध्ये पसरली. या पऱ्यांच्या हातातून जो कुणी आपल्या अंगावर पाणी शिंपडून घेईल. त्याला कोरोना होणार नाही, असा दावा करण्यात आला. त्यामुळे या देवीपऱ्यांकडून पवित्र पाणी शिंपडून घेण्यासाठी एकद गर्दी झाली. येथील लोकांना गावातील दोन महिलांच्या शरीरामध्ये देवपऱ्या आल्याचे सांगितले.

    पऱ्यांच्या दर्शनासाठी जमलेल्या गर्दीमुळे सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचा फज्जा उडाला. कोरोनाबाबतचे सर्व नियम पायदळी तुडवत येथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. अखेरीस पोलिसांनी या ठिकाणी धाव घेत गर्दीवर नियंत्रण मिळवले आणि पऱ्या असल्याचा दावा करणाऱ्या दोन्ही महिलांविरोधात गुन्हा दाखल केला.