17 kilogram cabbage

शिमला: हिमाचल प्रदेशातील(himachal pradesh) लाहौर स्पीतीमध्ये एका शेतकऱ्याने(farmer) १७.२ किलो वजनाच्या एका कोबीचे(17 kilo cabbage in farm) पीक घेतले आहे. या कोबीचा आकार आणि वजन पाहून सगळेच हैराण झाले आहेत.

शिमला: हिमाचल प्रदेशातील(himachal pradesh) लाहौर स्पीतीमध्ये एका शेतकऱ्याने(farmer) १७.२ किलो वजनाच्या एका कोबीचे(17 kilo cabbage in farm) पीक घेतले आहे. या कोबीचा आकार आणि वजन पाहून सगळेच हैराण झाले आहेत. सामान्यपणे बघितले जाते की, कोबीचे फूल एक किंवा दोन किलोचे असते. पण एक १७.२किलोची कोबी पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लाहौलच्या रलिंग गावातील शेतकरी सुनील कुमार याने ही कमाल केली आहे. सुनील कुमार हा ग्रॅज्युएट आहे. जैविक शेतीच्या माध्यमातून नवीन प्रयोग करून सुनील कुमारने १७.२ किलो वजनाची कोबी तयार केली आहे.

त्यांनी केलेल्या प्रयोगातून तयार झालेली १७ किलोची कोबी पाहून देशातील कृषी विश्वविद्यालय आणि कृषी संशोधन केंद्रातील वैज्ञानिकांना हैराण करून सोडले आहे. सगळेच अवाक् झाले आहेत. या शेतकऱ्याच्या परिवारातील लोकांनी सांगितले की, ते आधीपासूनच जैविक शेतीवर लक्ष केंद्रीत करतात. सामान्यपणे कोबीचे फूल दोन किलो किंवा एक किलोचे असते. पण यावर्षी त्यांनी १७.२ किलोची कोबी उगवली आहे.

दरम्यान, लाहौर स्पीतिचे बटाटे आणि मटर देशभरात प्रसिद्ध आहेत. इथे या भाज्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. असेही म्हटले तरी चालेल की, लाहौरची अर्थव्यवस्था या पिकांवर अवलंबून आहे. त्यासोबतच लाहौलमध्ये सफरचंदाचेही मोठे उत्पादन घेतले जाते.