पंजाबचे शेतकरी एकवटले, दिल्लीला कूच करण्याची तयारी, प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली

पंजाबमध्ये ठिकठिकाणाचे शेतकरी आपापल्या ट्रॅक्टरसह एकत्र जमू लागले आहेत. अनेकांनी दिल्लीकडे कूच करायला सुरुवात केली आहे. अधिकाधिक संख्येनं दिल्लीत उपस्थित राहून या रॅलीत सहभागी होण्याचं आवाहन शेतकरी संघटनांनी केलंय.

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी प्रजासत्ताक दिनी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढण्याचं आयोजन शेतकरी आंदोलकांनी केलंय. शांततेच्या मार्गानं कृषी कायद्यांना विरोध दर्शवण्यासाठी ही रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीत सहभागी होण्यासाठी पंजाबमधील शेतकऱ्यांची सध्या जोरदार तयारी सुरू आहे.

पंजाबमध्ये ठिकठिकाणाचे शेतकरी आपापल्या ट्रॅक्टरसह एकत्र जमू लागले आहेत. अनेकांनी दिल्लीकडे कूच करायला सुरुवात केली आहे. अधिकाधिक संख्येनं दिल्लीत उपस्थित राहून या रॅलीत सहभागी होण्याचं आवाहन शेतकरी संघटनांनी केलंय.

२६ जानेवारीला ट्रॅक्टर रॅली काढण्यावर दिल्लीतील आंदोलक शेतकरी ठाम आहेत. नव्या कृषी कायद्यांच्या विरोधातील शेतकरी आंदोलनाचा आज ५५ वा दिवस आहे. कडाक्याच्या थंडीत शेतकर्‍यांनी दिल्लीच्या सीमेवरील हे आंदोलन सुरू ठेवले आहे. केंद्र सरकारने तीन कृषी कायदे रद्द करावेत या मागणीवर शेतकरी ठाम आहेत.

याबाबत झालेल्या शेतकरी संघटनांच्या पत्रकार परिषदेत प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील रिंग रोडच्या बाहेरील भागात ट्रॅक्टर रॅली काढण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही परेड अतिशय शांततापूर्ण मार्गाने पार पडेल असे देखील सांगण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त पार पडणाऱ्या असं संचलनामध्ये याचा कुठलाही अडथळा येणार नाही, असंदेखील शेतकऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.आपल्या ट्रॅक्टरवर राष्ट्रध्वज फडकवू, असेदेखील शेतकऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे.