सरकार ५ वर्षं चालू शकतं, तर आंदोलनही ५ वर्षं चालू शकेल, शेतकरी नेते राकेश टिकैत यांचं मत

कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी सुरू असणारं आंदोलन पुढची पाच वर्षंदेखील चालू शकतं, असं विधान आंदोलनाचे नेते राकेश टिकैत यांनी केलंय. जर सरकार पाच वर्षं चालू शकतं, तर आंदोलनही पाच वर्षं चालू शकतं, असं ते म्हणाले. आता तर केवळ आंदोलनाला ५ महिने झालेत. शेतकरी जिथे आहेत, तिथे ते आंदोलन करत आहेत.

    केंद्र सरकारनं तीन कृषी कायदे रद्द करावेत आणि किमान हमीभावाबाबतच्या कायद्यात ठोस तरतुदी कराव्यात, या मागणीसाठी सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता वेगळंच वळण मिळताना दिसतंय. आंदोलन म्हणजे केवळ काही दिवसांचा इव्हेंट नसून जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहिल, अशी भूमिका आंदोलक शेतकऱ्यांनी घेतलीय.

    कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी सुरू असणारं आंदोलन पुढची पाच वर्षंदेखील चालू शकतं, असं विधान आंदोलनाचे नेते राकेश टिकैत यांनी केलंय. जर सरकार पाच वर्षं चालू शकतं, तर आंदोलनही पाच वर्षं चालू शकतं, असं ते म्हणाले. आता तर केवळ आंदोलनाला ५ महिने झालेत. शेतकरी जिथे आहेत, तिथे ते आंदोलन करत आहेत.

    केंद्र सरकारने केलेल्या जुलमी कायद्यांना देशभरातून विरोध होत असून शेतकरी जागोजागी आंदोलन करत असल्याचं टिकैत म्हणाले. शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतीकडं लक्ष देत आंदोलन सुरू ठेवावं, असा सल्ला टिकैत यांनी शेतकऱ्यांना दिलाय. आता जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत हे आंदोलन म्हणजे शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनाचा भाग झाल्याचं टिकैत यांनी म्हटलंय.

    भाजप नेत्यांच्या कार्यक्रमाला शेतकरी का विरोध करतात, या प्रश्नावर टिकैत यांनी उत्तर दिलंय. ज्या पक्षानं शेतकऱ्यांवर जुलूम करणारे कायदे केले, त्यांचा आम्ही हार घालून सत्कार करावा काय, असा प्रतिप्रश्न त्यांनी माध्यमांना केलाय. युद्धात कुणी लाडू वाटतं का, असाही सवाल  त्यांनी केलाय.