Fashion designer max; Jacket to save from bike accident

बाईक अपघातात प्राण गमविण्याच्या धोक्यापासून वाचविण्यासाठी सुंदरनगर येथील प्रगती शर्मा हिने लाईफ सेव्हिंग जॅकेट तयार केले आहे. प्रगती शर्मा राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्था, गांधीनगरमध्ये अंतीम वर्षात आहे. या अंतर्गत प्रोजेक्टमध्ये तिने हे जॅकेट तयार केले आहे. या जॅकेटला जीवन सुरक्षा बाईक वायू जॅकेट असे नाव देण्यात आले आहे. बाईक अपघात जर झाला तर या जॅकेटमध्ये आतमधून हवा भरली जाते. यामुळे कमी जखमा होतात. हे जॅकेट तयार करून प्रगतीने पहिल्या पाचमध्ये स्थान मिळविले आहे.

    सुंदरनगर : बाईक अपघातात प्राण गमविण्याच्या धोक्यापासून वाचविण्यासाठी सुंदरनगर येथील प्रगती शर्मा हिने लाईफ सेव्हिंग जॅकेट तयार केले आहे. प्रगती शर्मा राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्था, गांधीनगरमध्ये अंतीम वर्षात आहे. या अंतर्गत प्रोजेक्टमध्ये तिने हे जॅकेट तयार केले आहे. या जॅकेटला जीवन सुरक्षा बाईक वायू जॅकेट असे नाव देण्यात आले आहे. बाईक अपघात जर झाला तर या जॅकेटमध्ये आतमधून हवा भरली जाते. यामुळे कमी जखमा होतात. हे जॅकेट तयार करून प्रगतीने पहिल्या पाचमध्ये स्थान मिळविले आहे.

    प्रगती शर्मा हिचे म्हणणे आहे की, तिच्या एक मित्राने चंदिगडमध्ये बाईक अपघातात आपला जीव गमविला होता. त्याचदिवशी प्रगतीने अशा प्रकारचे जॅकेट तयार करण्याचा निर्णय घेतला होता. प्रगतीने सांगितले की, तीन महिन्याच्या अथक परिश्रमानंतर जीवन सुरक्षा बाईक वायू जॅकेट तयार करण्यात आले आहे. प्रगतीने केलेल्या या शोधामुळे सुंदरनगर व राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्था यांना अभिमान वाटत आहे.

    ऑगस्टमध्ये दिल्ली येथे होणाऱ्या टेक्सटाईल प्रदर्शनात प्रदर्शित करण्यात येणार आहे. हे जॅकेट दिसायला साधारण दिसत असले तरी, बाईकची एखाद्या वाहनाशी धडक झाल्यास जॅकेटच्या आता असलेले एअर बलूनमध्ये एका सेकंदात हवा भरली जाते. धडक झाल्यामुळे जेव्हा चालक खाली पडेल, त्यावेळी जॅकेटमधील एअर बलूनमुळे त्याला कमीत कमी जखमा होतील. या जॅकेटला पेटेंट बनविण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचेही प्रगतीने सांगितले.