संपूर्ण कुटुंब झालं उद्ध्वस्त, होम क्वारंटाईन असलेल्या पिता – पुत्रांचा कोरोनामुळे मृत्यू, मदत मागताना ‘त्या’ माऊलीचाही जीव घुसमटला

लखनऊमधील कृष्णानगर परिसरात एक भयानक प्रकार घडला आहे. होम क्वारंटाईन असलेल्या बापलेकाचा (father and son died at home due to corona) घरातच मृत्यू झाला.

    लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये कोरोना रुग्णांची(corona patients in uttar pradesh) संख्या वाढत आहे.मृतांची संख्या लक्षणीय आहे.उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील स्मशानभूमींमध्ये अंत्यसंस्कारासाठी रांगा लागल्या आहेत. लोकांना उपचार मिळत नसल्याने अनेकांचे घरातच मृत्यू होत आहे.

    लखनऊमधील कृष्णानगर परिसरात एक भयानक प्रकार घडला आहे. होम क्वारंटाईन असलेल्या बापलेकाचा घरातच मृत्यू झाला. धक्कादायक म्हणजे मृत्यू झाल्यानंतर दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिल्यावर दरवाजा तोडण्यात आला. त्यानंतर ही धक्कादायक घटना समोर आली. पासष्ठ वर्षीय अरविंद गोयल आणि २५ वर्षीय ईलू गोयल यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तसेच ६० वर्षीय पत्नी रंजना गोयल यांची प्रकृती गंभीर असून, त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे.

    कोरोना संसर्गामुळे गोयल कुटुंबावर घरातच उपचार सुरु होते. दिव्यांग असल्यामुळे    महिलेला चालता येत नव्हतं. पती आणि मुलाच्या मृत्यूनंतर या महिलेने आरडाओरड केला मात्र काही झाले नाही. उलट ओरडल्याने तिचा श्वास घुसमटायला लागला.

    दरम्यान, कृष्णा नगर सेक्टर डी परिसरात दुसऱ्या एका घरात आणखी एक मृतदेह मिळाला. विवेक शर्मा असं मृताचं नाव आहे. शेजाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार विवेक यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता, त्यांनी स्वत:ला आयसोलेट केलं होतं. मात्र घरीच त्यांचा मृत्यू झाला.