पिता पुत्र अनेक महिने तिच्यावर करत होते बलात्कार, अत्याचारानंतर पैसे कमवण्यासाठी केला ‘हा’ प्रकार – वाचा सविस्तर

अनेक महिने बलात्कार (Rape For Several Months) केल्यानंतर २७ वर्षीय तरुणीला विकण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

    मध्य प्रदेशात(Madhya Pradesh) भोपाळमधील(Bhopal) रतीबाद येथे धक्कादायक घटना घडली आहे. अनेक महिने बलात्कार (Rape For Several Months) केल्यानंतर २७ वर्षीय तरुणीला विकण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित तरुणीला आरोपी पिता-पुत्राने आपल्या ताब्यात ठेवलं होतं. बलात्कार केल्यानंतर त्यांनी एका तरुणीला ६० हजारात(Woman sold In 60 Thousand) अनोळखी व्यक्तीला विकलं.

    आरोपींची ओळख पटली असून रवी आणि रमेश अशी त्यांची नावं आहेत. महिलेशी लग्न करण्याच्या नावाखाली त्यांनी विदिशा येथील व्यक्तीकडून ६० हजार रुपये घेतले होते. पोलिसांना लग्नाची माहिती मिळताच त्यांनी धाड टाकली आणि महिलेची सुटका केली. आरोपी पिता-पुत्र फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या पतीला अटक करण्यात आली असून त्याला सहा महिन्यांपूर्वी न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं होतं. नोकरी शोधत असताना चार महिन्यांपूर्वी पीडितेची भेट रवीसोबत झाली होती. त्याने तिला नोकरी मिळवून देण्याचं आश्वासन दिलं होतं. पण त्याने तिला एका भाड्याच्या ठिकाणी नेलं आणि बलात्कार केला. यानंतर त्याचे वडील रमेश यानेही तिच्यावर बलात्कार केला.

    महिलेचा सौदा होत नाही तोवर कित्येक महिने पीडितेवर त्यांनी बलात्कार केला. आरोपींनी शर्मन प्रजापती नावाच्या एका व्यक्तीकडून ६० हजार रुपये घेतले आणि तरुणी त्याच्यासोबत लग्न करेल असं आश्वासन दिलं.