Father-in-law Chief Minister and Son-in-law MLA in Kerala Assembly

केरळमध्ये पहिल्यांदाच जावई आणि सासऱ्याची जोडी निवडणूक लढताना दिसली आणि या दोघांनीही इतिहासात एक नवा अध्यायच जणू लिहिला आहे. हे सासरे म्हणजे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि जावई म्हणजे पी.ए. मोहम्मद रियास. रियास हे डेमोक्रॅटिक युथ फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.

    दिल्ली : केरळमध्ये पहिल्यांदाच जावई आणि सासऱ्याची जोडी निवडणूक लढताना दिसली आणि या दोघांनीही इतिहासात एक नवा अध्यायच जणू लिहिला आहे. हे सासरे म्हणजे केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि जावई म्हणजे पी.ए. मोहम्मद रियास. रियास हे डेमोक्रॅटिक युथ फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.

    रियास हे विजयन यांची मुलगी वीणा यांचे पती असून ते बंगळुरूमधले एक व्यावसायिक आहेत. विजयन हे आपल्या होमपीचवरून म्हणजे धर्मदाममधून ५०,००० हून अधिक मतांनी विजयी झाले तर रियास हे कोझिकोडेमधला डाव्यांचा बालेकिल्ला असलेल्या बेपोरेमधून निवडून आले आहेत.

    याआधी राज्यात अनेक नेत्यांची मुले, मुली निवडणुकीला उभी राहिली होती. मात्र, जावई आणि सासरे हे दोघेही एकत्र उभे राहणे आणि निवडून येणे हे पहिल्यांदाच घडत आहे. रियास यांनी २००९ सालची लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र त्यात ते अयशस्वी ठरले.