संतापजनक – पैशांसाठी सासऱ्याने चक्क सुनेला विकण्याचा घातला घाट ? बातमी ऐकून सगळेच पडले चाट

पैशासाठी माणसांची तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीकडे स्वत:च्या सूनेला ८० हजार रुपयांना विकण्याचा प्रयत्न(Father in Law Sold Daughter in Law) एका सासऱ्याने केला असल्याचे समोर आले आहेे.

    माणसाची बुद्धी भ्रष्ट झाली किंवा तो पैशांसाठी हपापलेला असेल तर तो कुठल्याही थराला जाऊ शकतो. याची अनेक उदाहरणे आपण आपल्या आजुबाजूला बघत असतो. पैशासाठी माणसांची तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीकडे स्वत:च्या सूनेला ८० हजार रुपयांना विकण्याचा प्रयत्न(Father in Law Sold Daughter in Law) एका सासऱ्याने केला असल्याचे समोर आले आहेे.

    आजारपणाचे नाटक करुन सासऱ्याने आधी गाझियाबादहून सूनेला बोलावले होते. त्यानंतर गुजरातमधल्या व्यक्तीकडे तिची विक्री केली. मुलाला या सर्व प्रकाराची माहिती मिळताच त्याने त्वरित पोलिसांना याची माहिती दिली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

    रामनगरच्या मल्लापूर गावात राहणाऱ्या चंद्रराम वर्मा यांचा मुलगा प्रिन्स याने २०१९ मध्ये आसामच्या एका मुलीसोबत प्रेमविवाह केला होता. प्रिन्स आपल्या पत्नीसोबत गाझियाबादमध्ये राहत होता. तिथे तो टॅक्सी चालवण्याचे काम करत होता. त्यात गावात राहणाऱ्या रामू गौतमने गुजरातमध्ये लग्नासाठी मुलगी हवी असल्याचे चंद्रपाल याला सांगितले. त्यानंतर चंद्रपालने आपल्या सूनेलाच विकण्याचे ठरवले. आजारी असल्याचे खोटं सांगत त्याने सूनेला बोलवून घेतले आणि तिला त्या व्यक्तींकडे सोपवले.

    पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले आणि गुजरातमधील ८ जणांना अटक केली आहे.यामध्ये ३ महिलांचा समावेश आहे. दरम्यान चंद्रराम आणि अन्य एक व्यक्ती अद्याप फरार आहे. बाराबंकीच्या रामनगर पोलीस स्टेशनच्या परिसरात ही घटना घडली. प्रिन्सने त्याच्या वडीलांनी पत्नीला गुजरातमध्ये राहणाऱ्या काही लोकांना विकले असल्याची माहिती पोलिसांना दिली होती.

    पोलिसांना मानवी तस्करीबद्दल माहिती मिळताच त्यांना लगेचच रेल्वे स्टेशन गाठले. पोलिसांनी ८ जणांना ताब्यात घेतले. महिलेच्या पतीच्या तक्रारीनंतर पकडण्यात आलेल्या आठ लोकांसोबत रामू गौतम नावाच्या व्यक्ती विरोधात मानवी तस्करी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्य आरोपी त्या महिलेचा सासरा आणि रामू गौतम अद्याप फरार आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.