तीन वर्षाच्या चिमुरड्याला जीव जाईपर्यंत बदडून काढले; आईने मारहाणीचे कारण सांगीतल्यावर पोलिसांनाही धक्का बसला

चिमुरड्याची दोन भावंड आणि आई त्याला नराधाम बापाच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करत होती.  मात्र, त्याने कुणाचेही ऐकले नाही. अखेरीस या मारहाणीत चिमुरड्याने जीव सोडल्यावर हा नराधम बाप शुद्धीवर आला.

कानपूर : एका पित्याने आपल्या तीन वर्षाच्या चिमुरड्याला जीव जाईपर्यंत बदडून काढल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील कानपूरमध्ये घडली आहे. पित्याने मुलाला का मारले याचे कारण आईने सांगीतल्यावर पोलिसांनाही धक्का बसला. यानंतर पोलिसांनी या नराधम बापाला बेड्या ठोकल्या आहेत.

संतराम प्रजापती असं निर्दयी बापाचं नाव आहे. अंथरूणात लघुशंका केली म्हणून निर्दयी पित्याने आपल्या पोटच्या तीन वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत चिमुरड्याचा मृत्यू झाला आहे.

यावेळी या चिमुरड्याची दोन भावंड आणि आई त्याला नराधाम बापाच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न करत होती.  मात्र, त्याने कुणाचेही ऐकले नाही. अखेरीस या मारहाणीत चिमुरड्याने जीव सोडल्यावर हा नराधम बाप शुद्धीवर आला.

मुलाचा मृतदेह घेवून तो कुटुंबीयांसह हमीरपूर जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी पळून गेला होता. मात्र, त्याच्या पत्नीने पोलिस ठाण्यात धाव घेतली. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.