Father's anguish for the unborn child; 300 km journey by bicycle for child medicine

पोटच्या मुलांसाठी आईवडील कोणत्याही स्तराला जाऊ शकतात. त्यात प्रश्न जर मुलाच्या जीवाचा असेल तर स्वत:च्या जीवाचीची आईवडील पर्वा करीत नाही. याचाच प्रत्यय म्हैसूरमधील कोप्पालू गावात आला. कोप्पालू गावात मानसिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या मुलासाठी त्याच्या वडिलांनी 300 किलोमीटरचा प्रवास सायकलवरून केला आहे. 45 वर्षीय आनंद एक बांधकाम मजूर आहेत. त्यांनी त्यांच्या 10 वर्षीय मुलाच्या उपचारासाठी लागणारे औषध आणण्यासाठी सायकलवरून बंगळुरू गाठले. साधारण 300 किलोमीटरचा प्रवास त्यांनी सायकलवरून केला आणि मुलासाठी औषध आणले.

    बंगळुरू : पोटच्या मुलांसाठी आईवडील कोणत्याही स्तराला जाऊ शकतात. त्यात प्रश्न जर मुलाच्या जीवाचा असेल तर स्वत:च्या जीवाचीची आईवडील पर्वा करीत नाही. याचाच प्रत्यय म्हैसूरमधील कोप्पालू गावात आला. कोप्पालू गावात मानसिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या मुलासाठी त्याच्या वडिलांनी 300 किलोमीटरचा प्रवास सायकलवरून केला आहे. 45 वर्षीय आनंद एक बांधकाम मजूर आहेत. त्यांनी त्यांच्या 10 वर्षीय मुलाच्या उपचारासाठी लागणारे औषध आणण्यासाठी सायकलवरून बंगळुरू गाठले. साधारण 300 किलोमीटरचा प्रवास त्यांनी सायकलवरून केला आणि मुलासाठी औषध आणले.

    डोस चुकला असता तर…

    ‘माझा मुलगा मानसिकरीत्या कमजोर आहे. मला औषध आणायला सायकलने जावे लागले. मी जेव्हा बऱ्याच जणांना विचारले माझ्याबरोबर येता का? तेव्हा चारचाकी, दुचाकी आणि ऑटोनेही येण्यास नकार दिला. मी म्हैसूरमध्ये बऱ्याच ठिकाणी औषध शोधले. मात्र, ते फक्त नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरो सायन्स या ठिकाणी उपलब्ध होते, असे आनंद यांनी सांगितले. तसेच ते म्हणाले की, डॉक्टरांनी मला सांगितले जर हा एक डोस चुकला तर त्याला पुन्हा 18 वर्षे हा डोस द्यावा लागेल.

    कोणीही केली नाही मदत

    दरम्यान, लॉकडाऊनमुळे त्यांची कोणत्याही टॅक्सी किंवा ऑटोवाल्याने मदत केली नाही. मोटारसायकलवरूनही बंगळुरूमध्ये जाण्यास कुणी तयार झाले नाही. त्यामुळे त्यांना सायकल चालवतच पोहोचावे लागले. डॉक्टरांच्या मते त्यांचा मुलगा एकही डोस चुकवू शकत नाही. पण ते औषध म्हैसूरमध्ये उपलब्धच नसल्याने सायकलने त्यांना बंगळुरू गाठावे लागले.