Kamal Haasan Birthday Special

चेन्नई : भारतीय प्रशासकीय सेवेचे माजी अधिकारी (आयएएस) संतोषबाबू यांनी मंगळवारी चेन्नई येथे मक्कल निधी मय्यमचे संस्थापक आणि प्रमुख कमल हासन यांच्या उपस्थितीत पक्षात सहभागी झाले. चेन्नईत करण्यात आलेल्या विकास कामांमुळे संतोष बाबू यांची विशेष अशी ओळख आहे.

पुढील वर्षी तामिळनाडू विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून बाबूंचा पक्षात समावेश करण्यात आला आहे. यावेळी पक्षाचे प्रमुख कमल हासन यांनी शेतकरी मुद्यावरही आपले मत व्यक्त केले. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या पाहिजे असे ते म्हणाले.

दरम्यान, चक्रीवादळादरम्यान दिलासा देण्यासाठी राज्य सरकारच्या भूमिकेबद्दल विचारले असता, हासन म्हणाले, मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्या कार्यावर आम्ही समाधानी नाही. चक्रीवादळामुळे राज्यातील किनारपट्टी भागात बरेच नुकसान झाले आहे असे ते म्हणाले.