दिग्विजयसहित 200 जणांविरोधात एफआयआर; कोरोना नियमांचे उल्लंघन

व्हीडिओच्या माध्यमातून या 200 जणांची ओळख पटवली जात आहे. दिग्वजिय सिंह हे गोविंदपुरा औद्योगिक परिसरामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची लघु उद्योग संस्था असणाऱ्या भारती संस्थेला 10 हजार वर्ग फूट जमीन देण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन करत होते. गुन्हा दाखल केल्याची माहिती भोपाळच्या सहाय्यक पोलिस निरीक्षकांनी दिली. यावेळी पोलिसांनी बॅरिकेट्स लावून आंदोलकांना अडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दिग्विजय यांच्यासहीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी बॅरिकेट्सवर चढण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी वॉटर कॅननच्या मदतीने आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला.

    भोपाळ : मध्यप्रदेशची राजधानी असणाऱ्या भोपाळमध्ये कोरोना कालावधीत आंदोलन करून शासकीय आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी माजी मुख्यमंत्री आणि राज्यसभेचे खासदार दिग्विजय सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिग्विजय यांच्यासोबतच माजी मंत्री पीसी शर्मा, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष कैलाश मिश्रांसहीत 200 जणांविरोधात एफआयआर दाखल करण्यात आलीय. अशोक गार्डन पोलिस स्थानकामध्ये कमल 188, 147 आणि 269 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. माजी मुख्यमंत्री दिग्वजिय सिंह यांच्यासोबत पीसी शर्मा, काँग्रेस जिल्हा अध्यक्षांसोबतच 10 लोकांच्या नावाचा यामध्ये थेट उल्लेख आहे तर आंदोलनाच्या ठिकाणी गर्दी करणाऱ्या 200 अज्ञातांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    व्हीडिओच्या माध्यमातून या 200 जणांची ओळख पटवली जात आहे. दिग्वजिय सिंह हे गोविंदपुरा औद्योगिक परिसरामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची लघु उद्योग संस्था असणाऱ्या भारती संस्थेला 10 हजार वर्ग फूट जमीन देण्याच्या निर्णयाविरोधात आंदोलन करत होते. गुन्हा दाखल केल्याची माहिती भोपाळच्या सहाय्यक पोलिस निरीक्षकांनी दिली. यावेळी पोलिसांनी बॅरिकेट्स लावून आंदोलकांना अडविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा दिग्विजय यांच्यासहीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी बॅरिकेट्सवर चढण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी वॉटर कॅननच्या मदतीने आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला.

    काय आहे प्रकरण?

    भोपाळमधील गोविंदपुरा इंडस्ट्रियल एरियामध्ये गोविंदपुरा इंडस्ट्रीज असोसिएशनचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्यासमोर 10 हजार वर्ग फूट आकारमान असणारे एक पार्क आहे. दिग्विजय सिंह यांनी आरोप केला आहे की पार्कची जमीन सरकारने चुकीच्या पद्धतीन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित भारती या कंपनीला दिली आहे. या ठिकाणी भारतीचे कार्यालय उभारले जाणार असल्याचेही दिग्विजय सिंह म्हणाले आहेत. याठिकाणी भारती लघु उद्योग कार्यालयाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमाला विरोध करण्यासाठी दिग्विजय सिंह आणि त्यांचे सहकारी गोविंदपुरामध्ये पोहचले आणि तिथे त्यांची पोलिसांसोबत झटापट झाली.