love sex dhoka

तक्रारीत पीडितेने सांगितले की सुमारे ३ वर्षांपूर्वी ती रुड़की येथील कोचिंग सेंटरमध्ये सरकारी नोकरीची तयारी करत होती. याच दरम्यान तिची ओळख त्याच कोचिंग सेंटरमध्ये शिकणाऱ्या अमजदशी झाली. त्यांची मैत्री हळू हळू प्रेमात बदलली.

हरिद्वार : हरिद्वार येथील कनिष्ठ अभियंत्याने लग्नाचे नाटक करून एका खासगी शाळेच्या मुख्याध्यापिकेवर (headmistress ) बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. बलात्कार आरोपी तरुण हिमाचल प्रदेशातील ऊर्जा विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून तैनात आहे. या महिलेचा आरोप आहे की, लग्नाचे (Marriage) आमिष दाखवून तरूण गेल्या ३ वर्षांपासून तिच्यावर बलात्कार (raping headmistress ) करीत आहे. आता नोकरी मिळाल्यानंतर तो लग्न करण्यास नकार देत आहे. एवढेच नव्हे तर आरोपीने महिलेचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकीही दिली. पीडितेने केलेल्या तक्रारीवरून सिव्हिल लाइन्स कोतवाली पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल (FIR lodged against accused ) करून तपास सुरू केला आहे.

पोलिसात दिलेल्या तक्रारीत पीडितेने सांगितले की सुमारे ३ वर्षांपूर्वी ती रुड़की येथील कोचिंग सेंटरमध्ये सरकारी नोकरीची तयारी करत होती. याच दरम्यान तिची ओळख त्याच कोचिंग सेंटरमध्ये शिकणाऱ्या अमजदशी झाली. त्यांची मैत्री हळू हळू प्रेमात बदलली. या युवकाने मुलीला आपल्या कुटूंबाशीही ओळख करून दिली आणि लग्न करण्याविषयी बोलले. अमजदने तिला कोचिंग सेंटरमध्ये बोलावले आणि तेथेच तिच्यावर बलात्कार केला, असा महिलेने आरोप केला आहे. काही काळानंतर अमजद जेई झाला आणि मुलगीही एका खासगी शाळेत प्राचार्य म्हणून काम करू लागली. यानंतरही आरोपींनी त्या युवतीला अनेक ठिकाणी नेऊन कोल्ड ड्रिंक देऊन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले.

अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी

महिलेचा असाही आरोप केला आहे की, जेव्हा महिलेने अमजदवर लग्नासाठी दबाव आणला तेव्हा त्याने अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी जेई अमजद अली याच्याविरूद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. कोतवाली प्रभारी राजेश शहा यांनी सांगितले की, तहरीरच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा सखोल तपास केला जात आहे.