पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना घेराव घालून गोंधळ, अकाली दलाच्या ९ आमदारांवर गुन्हा दाखल

पंजाबचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर(manoharlal khattar) जेव्हा मीडियाला संबोधित करीत होते तेव्हा अकाली दलाच्या आमदारांनी(akali dal mla) खट्टर यांना घेराव घालीत गोंधळ घातला होता. या संदर्भात विधानसभा अध्यक्ष ज्ञानचंद गुप्ता यांनी अकाली दलाच्या आमदारांविरुद्ध चंदीगडमधील सेक्टर तीन पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवत तक्रार दाखल केली होती. आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

    चंदीगढ: पंजाब-हरियाणा(punjab haryana) विधानसभा परिसरात अर्थसंकल्पीय अधिवेशनात(budget session) मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्यासमोर गोंधळ करणाऱ्या शिरोमणी अकाली दलाच्या ९ आमदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खट्टर जेव्हा मीडियाला संबोधित करीत होते तेव्हा अकाली दलाच्या आमदारांनी खट्टर यांना घेराव घालीत गोंधळ घातला होता. या संदर्भात विधानसभा अध्यक्ष ज्ञानचंद गुप्ता यांनी अकाली दलाच्या आमदारांविरुद्ध चंदीगडमधील सेक्टर तीन पोलीस ठाण्यात एफआयआर नोंदवत तक्रार दाखल केली होती. आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हरियाणा विधानसभेत या घटनेचा निषेध करणारा ठरावही मंजूर करण्यात आला होता.

    सभापतींनी घटनेची माहिती देत सांगितले की, मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर सभागृहातून बाहेर येऊन माध्यमांना माहिती देत होते तेव्हाच अकाली दलाच्या आमदारांनी विधानसभेच्या गेटजवळ जाऊन गोंधळ सुरू केला. मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न करीत त्यांना काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न केला जात होता आणि घोषणाबाजीही केली गेली. सभापतींनी आमदाराच्या या निर्णयाला सन्मानाविरुद्ध म्हटले.