शताब्दी एक्सप्रेसच्या डब्याला आग, गाझीयाबाद रेल्वे स्टेशनवर खळबळ

गाझीयाबाद रेल्वे स्थानकावर सकाळच्या सुमाराला शताब्दी एक्सप्रेस उभी होती. या रेल्वेतील जनरेटरच्या डब्यतून धूर येत असल्याचं लक्षात आलं. बघता बघता या आगीनं पेट घेतला आणि जनरेटरच्या पूर्ण डब्याला कवेत घेतलं. काही मिनिटांत ही आग भडकल्यामुळे सुरुवातीला प्रवाशांची धावाधाव झाली आणि त्यानंतर हा प्रकार  पाहण्यासाठी एकच  गर्दी प्रवाशांनी केली. 

    उत्तर प्रदेशातील गाझीयाबाद रेल्वे स्टेशनवर उभ्या असणाऱ्या रेल्वेला आग लागल्यामुळे खळबळ उडालीय. गाझीयाबाद रेल्वे स्टेशनवर उभ्या असणाऱ्या रेल्वेनं अचानक पेट घेतला. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर असणाऱ्या प्रवाशांमध्ये घबराट पसरली.

    गाझीयाबाद रेल्वे स्थानकावर सकाळच्या सुमाराला शताब्दी एक्सप्रेस उभी होती. या रेल्वेतील जनरेटरच्या डब्यतून धूर येत असल्याचं लक्षात आलं. बघता बघता या आगीनं पेट घेतला आणि जनरेटरच्या पूर्ण डब्याला कवेत घेतलं. काही

    रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर उभे राहून प्रवासी आग पाहत होते आणि इतर प्रवाशांना वाचवण्याचा प्रयत्न करत होते. अग्निशमन दलाला तातडीनं पाचारण करण्यात आलं असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ही आग नेमकी का भडकली, याचं कारण अद्याप स्पष्ट नसलं, तरी शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या आगीत किती जण जखमी झाले, याचीही माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.