fire at hpcl

विशाखापट्टनम(Visakapatnam) येथील हिंदुस्थान पेट्रोलियम कॉरपोरेशन लिमिटेडच्या(HPCL) रिफायनरीला मंगळवारी आग लागण्याची(Fire at HPCL) घटना घडली.

    आंध्रप्रदेशच्या(Andhra Pradesh) विशाखापट्टनममधील(Visakapatnam) हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या(HPCL) रिफायनरीला आज आग लागण्याची(Fire at HPCL) घटना घडली.

    या घटनेनंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांनी आग आटोक्यात आणली. आगीचे कारण अजून समजलेले नाही.

    एपीसीएलच्या जुन्या टर्मिनलच्या क्रूड डिस्टिलेशन युनिटमध्ये ही भीषण आग लागली. घटनेनंतर लगेचच कर्मचारी व कामगार युनिटच्या बाहेर आले. मोठा स्फोट होऊन ही आग लागली. अग्निशमन यंत्रणेद्वारे आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र आग मोठ्या स्वरुपात असल्याने अग्निशमन दलाला पाचारण करावे लागले. त्यानंतर ही आग आटोक्यात आली.


    एचपीसीएलच्या विसाख रिफायनरीच्या एका क्रूड प्रोसेसिंग युनिटमध्ये आग लागण्याची घटना घडली. अग्निशमन विभागाच्या प्रयत्नाने ही आग तातडीने विझवण्यात आली. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही तसेच इतर रिफायनरी सुद्धा सुरक्षित असल्याचे एचपीसीएलतर्फे सांगण्यात आले.