गाझियाबादमध्ये PPE किट बनविणाऱ्या कंपनीला भीषण आग; १४ जण जखमी

लिंकरोडच्या इंडस्ट्रीयल एरियामधील १२/७१ फॅक्टरीमध्ये ही आग लागली आहे. फॅक्टरीमध्ये आग लागण्याची सूचना मिळताच फायर बिग्रेडच्या काही गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. साहिबाबाद आणि वैशाली फायर स्टेशनच्या गाड्या पोहोचल्या आहेत.

    गाझियाबादमध्ये PPE किट बनविणाऱ्या एका कंपनीला भीषण आग लागली आहे. यामध्ये १४ जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, लिंकरोडच्या इंडस्ट्रीयल एरियामधील १२/७१ फॅक्टरीमध्ये ही आग लागली आहे. फॅक्टरीमध्ये आग लागण्याची सूचना मिळताच फायर बिग्रेडच्या काही गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. साहिबाबाद आणि वैशाली फायर स्टेशनच्या गाड्या पोहोचल्या आहेत.

    आगीत जखमी झालेल्यांपैकी ५ जणांना मॅक्स हॉस्पिटलमध्ये आणि ८ लोकांना यशोदा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या फॅक्टरीमध्ये मास्क आणि पीपीई किट बनविण्यात येते. काही तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे.

    या आगीत दोन महिला आणि एक अल्पवयीन मुलासह १४ लोक जखमी झाले आहे. यामध्ये ४ लोकांची प्रकृती गंभीर झाली आहे. कंपनीमध्ये असलेल्या केमिकलच्या ड्रमचाही स्फोट झाला आहे. यामुळे इमारतीचा काही भाग तुटला आहे. आग कशी लागली याचे कारण अद्याप समजलेले नाही.