उत्तराखंडच्या जंगलांतील आग आणखी भडकली, हेलिकॉप्टरही पडतायत अपुरी

उत्तराखंडमधील कुमाऊ आणि गढवाल या दोन्ही विभागातील अनेक ठिकाणी आग भडकलीय. सुमारे ४० पेक्षा जास्त जंगलांमध्ये आगीनं रौद्र रूप धारण केल्याची माहिती मिळतेय. नैनीताल जिल्ह्यातील कित्येक जिल्ह्यांत असणाऱ्या जंगली परिसरात छोट्या मोठ्या आगी पेटण्याच्या घटना घडत आहेत. केंद्र सरकारनं सध्या आग विझवण्यासाठी हेलिकॉप्टर्स पाठवले असून एनडीआरएफच्या मदतीनं आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र अद्याप त्यात यश येताना दिसत नाही. 

    उत्तराखंडमधील एकामागून एक जंगलं सध्या आगीच्या भक्ष्यस्थानी पडतायत. सर्व प्रयत्न करूनही या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अद्याप यश आलेलं नाही. जंगलांमध्ये एकामागून एक वणवे लागत असून उत्तराखंड सरकारनं केंद्र सरकारकडे अधिक मदतीची मागणी केलीय.

    उत्तराखंडमधील कुमाऊ आणि गढवाल या दोन्ही विभागातील अनेक ठिकाणी आग भडकलीय. सुमारे ४० पेक्षा जास्त जंगलांमध्ये आगीनं रौद्र रूप धारण केल्याची माहिती मिळतेय. नैनीताल जिल्ह्यातील कित्येक जिल्ह्यांत असणाऱ्या जंगली परिसरात छोट्या मोठ्या आगी पेटण्याच्या घटना घडत आहेत. केंद्र सरकारनं सध्या आग विझवण्यासाठी हेलिकॉप्टर्स पाठवले असून एनडीआरएफच्या मदतीनं आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र अद्याप त्यात यश येताना दिसत नाही.

    उत्तराखंडमध्ये सातत्यानं आग लागण्याच्या घटना घडत आहेत. गेल्या ६ महिन्यात १ हजारपेक्षा अधिक ठिकाणी आग लागण्याच्या घटना घडल्यात. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवरून संवाद साधला असून परिस्थितीचा आढावा घेतलाय. आवश्यक ती सर्व पुरवण्याचं आश्वासन गृहमंत्र्यांनी दिलंय.

    सरकारनं दिलेल्या माहितीनुसार एकूण ४५ जंगलांमध्ये ९६४ ठिकाणी आग भडकलीय. वातावरणातील उष्णता अचानक वाढल्यामुळे आग लागण्याच्या घटना घडत आहेत.