Fire rages in commercial complex in Ahmedabad

अग्निशमन विभागाचे वरिष्ठ अधिकारी राजेश भट्ट म्हणाले, "आग कशामुळे लागली, हे तपासानंतरच कळू शकेल." बापूनगरमधील श्याम शिखर कॉम्प्लेक्स ही घटना घडली. रविवारी सकाळी आगीची ही घटना घडली.

अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबादमध्ये (Ahmedabad)  एका व्यावसायिक संकुलाला आग लालगल्याची (Fire rages in commercial complex) घटना घडली आहे. बापूनगर परिसरातील शॉपिंग कॉम्पलेक्समध्ये (commercial complex) आग लागल्याने २२ दुकाने आगीच्या विळख्यात सापडल्याने जळून खाक झाली आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचल्या आहेत. अग्निशमन दालाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

माहितीनुसार अग्निशमन विभागाचे वरिष्ठ अधिकारी राजेश भट्ट म्हणाले, “आग कशामुळे लागली, हे तपासानंतरच कळू शकेल.” बापूनगरमधील श्याम शिखर कॉम्प्लेक्स ही घटना घडली. रविवारी सकाळी आगीची ही घटना घडली. घटनेच्या वेळी कॉम्प्लेक्सची सर्व दुकाने बंद होती, ज्यामुळे कोणतीही जिवितहानी झाली नाही.