ऑक्सिजनसाठी गोळीबार; UP,बिहार नाही तर मोदींच्या गुजरातमधील महाभयानक वास्तव

कोरोना विषाणूची दुसरी लाट देशात प्रचंड नुकसान करणारी ठरली आहे. तर दुसरीकडे ऑक्सिजन कमी पडत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. आता ऑक्सिजनसाठी लोक एकमेकांचा जीव घेतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

    अहमदाबाद : कोरोना विषाणूची दुसरी लाट देशात प्रचंड नुकसान करणारी ठरली आहे. तर दुसरीकडे ऑक्सिजन कमी पडत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. आता ऑक्सिजनसाठी लोक एकमेकांचा जीव घेतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

    गुजरातच्या कच्छमध्ये काहीजण ऑक्सिजन सिलिंडर रिफिल करणाऱ्या कंपनीत शिरले आणि तिथल्या कर्मचाऱ्यांना धमकावण्यात आले व गोळीबार देखील करण्यात आला. कंपनीचे कर्मचारी आणि कंपनीत शिरलेल्या काही लोकांमध्ये वाद झाला.

    आत शिरलेल्या या लोकांनी कर्मचाऱ्यांवर बंदूक रोखली आणि मारामारी सुरू केली. एका गुंडाने तर सलग तीनवेळा हवेत गोळीबार करत दहशत निर्माण केली. पोलिसांना मिळताच पोलिस त्या ठिकाणी पोहोचले. मात्र तो पर्यंत हे गुंड तिथून फरार झाले होते. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.