On the one hand the joy of being kissed and on the other hand the wife understood the news of her husbands death during the presentation

सध्या लग्नात नवा ट्रेंड सुरू झाला आहे तो म्हणजे नवरदेवाची आणि नवरीची एन्ट्री. आपण घोड्यावरून, हत्तीवरून, आलिशान कारमधून किंवा मग हेलिकॉप्टरमधून पाहिली असेल. नवरीच्या एन्ट्रीमध्ये नवरी कधी बुलेट चालव येते तर कधी डान्स करत लग्नमंडपात एन्ट्री घेते. सध्या सोशलवरही अशाच नवरीच्या एन्ट्रीचे व्हीडियो व्हायरल होताना दिसतात. पण उत्तरप्रदेशच्या प्रतापगड इथे मात्र नवरीची एन्ट्री पाहून तुम्ही थक्क व्हाल. नवरीने लग्न मंडपात हवेत गोळीबार करत तिची हौस पूर्ण केली आहे. सध्या हा व्हीडिओ सोशलवर व्हायरल होत आहे. या प्रकरणाची पोलिसांनी दखल घेत वधूसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    लखनौ : सध्या लग्नात नवा ट्रेंड सुरू झाला आहे तो म्हणजे नवरदेवाची आणि नवरीची एन्ट्री. आपण घोड्यावरून, हत्तीवरून, आलिशान कारमधून किंवा मग हेलिकॉप्टरमधून पाहिली असेल. नवरीच्या एन्ट्रीमध्ये नवरी कधी बुलेट चालव येते तर कधी डान्स करत लग्नमंडपात एन्ट्री घेते. सध्या सोशलवरही अशाच नवरीच्या एन्ट्रीचे व्हीडियो व्हायरल होताना दिसतात. पण उत्तरप्रदेशच्या प्रतापगड इथे मात्र नवरीची एन्ट्री पाहून तुम्ही थक्क व्हाल. नवरीने लग्न मंडपात हवेत गोळीबार करत तिची हौस पूर्ण केली आहे. सध्या हा व्हीडिओ सोशलवर व्हायरल होत आहे. या प्रकरणाची पोलिसांनी दखल घेत वधूसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    काय आहे प्रकरण?

    ही घटना उत्तरप्रदेशच्या प्रतापगड येथे घडली आहे. येथील एका लग्नात नवरीने थेट हवेत गोळीबार करत लग्न मंडपात एन्ट्री घेतली. नवरीचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. प्रतापगड येथे जेठवारा ठाण्यापासून तीन किलोमीटर दूर असलेल्या एका गावात लग्नसमारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी रात्री सुमारे अकरा नवरीने लग्नासाठी स्टेजवर चढत असतानाच तिथे उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने तिच्या हातात रिवॉल्वर दिली.

    नवरीने स्टेजवर चढताच हवेत गोळीबार केला. यानंतर तिने नवरदेवाच्या गळ्यात वरमाला घातली. यादरम्यान, लोकांनी टाळ्या वाजवत आनंद व्यक्त केला. गिरिजा शंकर पांडे यांची मुलगी रूपा हिने आपल्या लग्नात आपले काका रामदास पांडेय यांचा परवाना असलेल्या बंदुकीतून गोळीबार केल्याचे चौकशीत समोर आले. त्यानंतर पोलिसांनी वधू रूपा पांडे, तिचे वडील आणि काका यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच संबंधित बंदूकही पोलिसांनी ताब्यात घेतली. या बंदुकीचा परवाना रद्द करण्याची कारवाई पोलिसांनी सुरू केली. 30 मे रोजी हा विवाह पार पडला. या प्रकरणात वधूला अटकही होऊ शकते.

    दरम्यान, हा व्हीडिओ काहीच क्षणात सोशलवर व्हायरल होताच एसओ जेठवारा संजय पांडे यांना याबाबत विचारणा करण्यात आली. मात्र, याबाबत आपल्याला काहीही माहिती नसल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, हे खरेच झाले असल्यास याप्रकरणी लायसन्स जप्त करण्याची कारवाई केली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.