गुजरातमध्ये Love Jihad प्रकरणात पहिला गुन्हा दाखल, नाव आणि धर्म लपवून लग्नाच्या जाळ्यात ओढलं ; पोलिसांकडून आरोपीला अटक

मिळालेल्या माहितीनुसार, वडोदरामध्ये तरसाली या विभागात राहणाऱ्या २५ वर्षीय समीर अब्दुलभाई कुरैशी यांनी सॅम मार्टीन असं खोटं नाव ठेवून एका हिंदू महिलेशी मैत्री केली. त्यानंतर तिच्याशी जवळीक करून त्यांनी महिलेशी लग्न केलं. खरं समोर आल्यानंतर २५ वर्षीय हिंदू महिलाने समीर कुरैशी यांच्याविरोधात ख्रिश्चन बनून तिच्याशी लग्न केल्याची तक्रार करण्यात आली आहे. 

    गांधीनगर: गुजरातमध्ये (Gujarat) लव्ह जिहाद कायदा (Love Jihad) लागू करण्यात आला आहे. हा कायदा लागू झाल्यानंंतर तीन दिवसांच्या आतच वडोदरा मध्ये गुजरात धर्म संशोधन अधिनियम २०२१ चं उल्लंघन केल्याबद्दल पहिलं प्रकरण समोर आलं आहे. या तक्रारीवर कार्यवाही केली असता पोलिसांनी आरोपांना अटक केली आहे.

    ख्रिश्चन बनून हिंदू महिलेशी केलं लग्न

    मिळालेल्या माहितीनुसार, वडोदरामध्ये तरसाली या विभागात राहणाऱ्या २५ वर्षीय समीर अब्दुलभाई कुरैशी यांनी सॅम मार्टीन असं खोटं नाव ठेवून एका हिंदू महिलेशी मैत्री केली. त्यानंतर तिच्याशी जवळीक करून त्यांनी महिलेशी लग्न केलं. खरं कारण समोर आल्यानंतर २५ वर्षीय हिंदू महिलाने समीर कुरैशी यांच्याविरोधात ख्रिश्चन बनून तिच्याशी लग्न केल्याची तक्रार दाखल केली आहे.

    वडोदरामधील गोत्री पोलीस स्टेशनचे निरीक्षक एसवी चौधरी यांनी सांगितलं की, हिंदू महिलाने तक्रार दाखल करत कुरैशीने इंस्टाग्रामच्या माध्यमातून तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर त्या महिलेला सॅम मार्टीन या ख्रिश्चन नावाने ओळख करून दिली. मार्टीनने महिलेशी शारीरिक संबंध ठेवण्यासाठी मजबूर केलं आणि काही फोटोज सुद्धा काढण्यात आले होते. आरोपीने धमकी देत सांगितलं की, जर त्या महिलेने माझ्याशी लग्न केलं नाही तर मी तुझे फोटोज व्हायरल करून टाकून देईल. त्यानंतर दोघांनीही २०१९ मध्ये लग्न केलं होतं.

    वडोदराचे डीसीपी जयराजसिंग यांनी सांगितलं की, गुजरात धर्म संशोधन अधिनियम २०२१ च्या आयपीएस  376, 377, 504, 506 (2) आणि खंड (4) च्या कलमानुसार त्या व्यक्तिला अटक करण्यात आली आहे.