nagpur man died suffocate sex in diffrent position at nagpur khaperkheda nrvb

देशातलं पहिलं सेक्स टॉय स्टोअर(first sex toy store of India is closed) गोव्यात सुरू करण्यात आलं होतं. कामाकार्ट आणि गिज्मोसवाला या दोन कंपन्यांनी हे सुरु केलेलं हे गोव्यातल दुकान महिनाभरातच बंद करावं लागलं आहे. स्थानिक पंचायतीने इशारा दिल्यामुळे दुकान बंद कराव लागलं असल्याचं दुकानदारांच म्हणणं आहे.

    भारतात लोक कितीही पुरोगामी असल्याचा दावा करत असले तरी. लैंगिकतेशी संबंधित गोष्टींवर बोलायला फारसे कोणी धजावत नाही. याच कारणामुळे आजवर भारतात सेक्स टॉय स्टोअर असावे,असा विचारच कुणीही केला नव्हता.

    देशातलं पहिलं सेक्स टॉय स्टोअर गोव्यात सुरू करण्यात आलं होतं. कामाकार्ट आणि गिज्मोसवाला या दोन कंपन्यांनी हे सुरु केलेलं हे गोव्यातल दुकान महिनाभरातच बंद करावं लागलं आहे. स्थानिक पंचायतीने इशारा दिल्यामुळे दुकान बंद कराव लागलं असल्याचं दुकानदारांच म्हणणं आहे.

    Kama Gizmos असं या दुकानाचं नाव आहे. पणजीतील कलंगुट भागात व्हॅलेंटाईन डेला हे सेक्स टॉय स्टोअर सुरु झालं. मात्र महिनाभरातच या दुकानाला टाळं लावण्याची वेळ आली.

    मिळालेल्या  माहितीनुसार, दुकानाच्या परवान्याची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत असं दुकान उघडू नये असा इशारा स्थानिक प्रशासनानं दुकानदारांना दिला आहे. तर आम्ही गोवेकर नसल्याने आम्हाला कुणीही सहज निशाणा बनवू शकतं, अशी प्रतिक्रिया दुकानाचे संचालक  प्रवीण गणेशन यांनी दिली आहे.

    दुकान बंद करण्याबाबत कलंगुटचे सरपंच दिनेश सीमेपुरूस्कर म्हणाले,“या दुकानाबद्दल नागरिकांच्या तोंडी तक्रारी येऊ लागल्या होत्या. कलंगुटमधील प्रसिद्ध अशा बाजारपेठेच्या दर्शनीय ठिकाणीच हे दुकान असल्याने लोकं तक्रारी करत होते. त्याचबरोबर दुकानाला परवाना नसल्याच्या तक्रारीही ग्रामस्थांकडून आल्या. त्यामुळे बुधवारी दुकान बंद करण्यात आलं आणि होर्डिग्जही हटवण्यात आल्या.”