म्हैसूर सामूहिक बलात्कारप्रकरणी पाच जणांना अटक; पीडितेच्या मित्राला मारहाण करुन केला अत्याचार

म्हैसूरमध्ये चामुंडी येथे फिरायला गेलेल्या एका एमबीएच्या विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. पीडित मुलगी मित्रासमवेत असताना ही घटना घडली होती. मुलीच्या मित्राला आरोपींनी मारहाण केली होती. या घटनेने दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणाची आठवण करून दिली.

    बंगळुरू : देशाला हादरवून सोडणाऱ्या म्हैसूरमध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली. कर्नाटकचे डीजीपी प्रवीण सूद यांनी ही माहिती दिली आहे. सहावा आरोपी अजून हाती आलेला नसून, पोलिस त्याच्या मागावर आहेत, असे सूद यांनी सांगितले. अटक करण्यात आलेले पाचही आरोपी तामिळनाडूतून आलेले मजूर आहेत. त्यांच्यात एक आरोपी अल्पवयीन असण्याची शक्यता आहे. आम्ही आता पूर्ण खात्रीनिशी सांगू शकत नाही. त्या आरोपीच्या वयाचा तपास सुरू आहे, अशी माहिती सूद यांनी दिली.

    या घटनेनंतर सायंकाळी साडेसहानंतर कुकरहल्ली तलाव परिसरात प्रवेश करण्यावर निर्बंध लादण्यात आले आहे. हा निर्णय म्हैसूर विद्यापीठाने सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हा निर्णय घेतला आहे. सायंकाळी 6.30 नंतर कँपसमध्ये विद्यार्थ्यांच्या येण्या-जाण्यावरही निर्बंध असेल. ठराविक वेळेनंतर विद्यार्थिनींना परिसरात बसण्याची आणि फिरण्याची परवानगी नसेल.

    उल्लेखनीय आहे की, म्हैसूरमध्ये चामुंडी येथे फिरायला गेलेल्या एका एमबीएच्या विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. पीडित मुलगी मित्रासमवेत असताना ही घटना घडली होती. मुलीच्या मित्राला आरोपींनी मारहाण केली होती. या घटनेने दिल्लीतील निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणाची आठवण करून दिली.