अरुणाचल प्रदेशमधून गायब झालेल्या ५ युवकांना चीनने परत सोडले

जवळपास १० दिवसांपासून हे युवक गायब होते. चीनच्या सैनिकांनी त्यांच्या अपहरण केल्याचे सांगितले जात होते. ७ युवक सुबनसिरी जिल्ह्यातील भारत-चीन सीमा भागात शिकारीसाठी गेले होते. यावेळी ५ युवकांना पकडण्यात आले होते. तर दोन युवक स्वतःला वाचवत कसे तरी परतले होते व त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली होती.

अरुणाचल प्रदेश : चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (PLA) अरुणाचल प्रदेशमधूम (Arunachal Pradesh) गायब झालेल्या ५ युवकांना (Five youths) परत मायदेशात सोडले आहे. पाचही जणांना भारतात सोडण्यात आले आहे. ते १ तास अंतर पायी चालल्यावर किबिथू सीमा चौकी येथे पोहचतील.

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले होते की, अरुणाचल प्रदेशमधून हरवलेल्या ५ युवकांना पीएलएने भारतात परत पाठवणार असल्याचा दावा केला होता. संबंधित युवक त्यांच्या भागात पोहोचले होते.


जवळपास १० दिवसांपासून हे युवक गायब होते. चीनच्या सैनिकांनी त्यांचे अपहरण केल्याचे सांगितले जात होते. ७ युवक सुबनसिरी जिल्ह्यातील भारत-चीन सीमा भागात शिकारीसाठी गेले होते. यावेळी ५ युवकांना पकडण्यात आले होते. तर दोन युवक स्वतःला वाचवत कसे तरी परतले होते व त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली होती.