
अहमदाबाद : गुजरातचे माजी मुख्यमंत्री शंकरसिंह वाघेला यांनी शनिवारी केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी संघटनांना समर्थन देण्याची घोषणा केली आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी वाघेला यांनी अहमदाबादमध्ये ‘चलो दिल्ली’ अभियानास प्रारंभ केला.
पोलिसांना त्यांच्या समर्थकांची गर्दी होण्याची शक्यता आधीपासूनच होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पोलिसांच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर पोलिसांनी त्यांना घरी नजरकैद केले.
गांधी आश्रमाच्या बाहेर पोलिसांनी वाघेला यांच्या समर्थकांना पुढे जाण्यापासून रोखले. काहींना ताब्यातही घेतले. याबाबत पोलिसांचे म्हणणं होतं की, त्यांना यासाठी थांबवलं गेले कारण ते दिल्लीच्या दिशेला आपले विरोधी प्रदर्शन सुरू करत होते. त्यांच्या पोस्टरवर दिल्ली चलोची घोषणाही होती. त्यावर शंकरसिंह वाघेला यांचे नाव देखील लिहिले होते. तसेच शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी देखील करण्यात आली.