
देशाच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या घडामोडी नेहमीच दक्षिण भारतात घडत असतात. त्यातल्या त्यात कर्नाटकातील राजकारण तर यासाठीच ओळखलं जातं. जर देवेगौडा आणि त्यांचे सुपुत्र माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी (H D Kumaraswamy) यांनी आपला पक्ष भाजपमध्ये विलीन केला तर तो भाजपविरोधी आघाडीसाठी मोठा धक्का असेल.
बंगळुरु (Bengluru). देशाच्या राजकारणात खळबळ उडवून देणाऱ्या घडामोडी नेहमीच दक्षिण भारतात घडत असतात. त्यातल्या त्यात कर्नाटकातील राजकारण तर यासाठीच ओळखलं जातं. जर देवेगौडा आणि त्यांचे सुपुत्र माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी (H D Kumaraswamy) यांनी आपला पक्ष भाजपमध्ये विलीन केला तर तो भाजपविरोधी आघाडीसाठी मोठा धक्का असेल.
उत्तर भारतात शेतकरी आंदोलनाने राजकीय वातावरण ढवळून निघालं असताना, इकडे दक्षिण भारतात वेगळंच राजकारण रंगत आहे. कर्नाटक (Karnataka politics) विधानपरिषदेत सभापतींना खुर्चीवरुन खाली खेचल्याचं देशाने पाहिलं. या निमित्ताने जवळ आलेले कट्टर विरोधक भाजप (BJP) आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवगौडा यांची जनत दल (एस) (JDS) मोठा निर्णय घेण्याची चर्चा आहे. माजी पंतप्रधान देवेगौडांचा (H D Deve Gowda) पक्ष जेडीएस थेट भाजपमध्येच विलीन होणार असल्याच्या चर्चा कर्नाटकात रंगल्या आहेत. मात्र सध्या तरी दोन्ही पक्षांकडून या चर्चा फेटाळल्या जात आहेत.
नेमकं काय घडलं कर्नाटकात ?
कर्नाटकात सध्या बी एस येडीयुरप्पा यांच्या नेतृत्त्वातील भाजपचं सरकार आहे. कर्नाटक विधानपरिषेदत मंगळवारी 15 डिसेंबरला गोरक्षा विधेयकावरुन (Karnataka anti-cow slaughter bill) जोरदार राडा झाला. यावेळी काँग्रेसच्या आमदारांनी विधानपरिषेदच्या उपसभापतींना अक्षरश: सभागृहातून खेचून नेत बाहेर काढले. हा सगळा गोंधळ शांत करण्यासाठी सभागृहात मार्शल्सना पाचारण करावे लागलं होतं. कर्नाटक सरकारने गायींची रक्षा करणाऱ्या व्यक्तींच्या संरक्षणासाठी एक विधेयक सभागृहात मांडले होते. मात्र, या विधेयकामुळे गोरक्षकांना संरक्षण मिळेल, असा विरोधकांचा आक्षेप आहे.
भाजप-जेडीएसची जवळीक कशी?
या राड्यावेळी भाजप आणि जेडीएस एकत्र होते. भाजपने आणलेल्या गोरक्षा कायद्याला जेडीएसने पाठिंबा दिला होता. जी जेडीएस काँग्रेससोबत सत्तेत होती, काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे एच डी कुमारस्वामी मुख्यमंत्री झाले, त्याच जेडीएसने भाजपला पाठिंबा कसा दिला, असा प्रश्न कर्नाटकात उपस्थित होत आहे. याच जवळीकीवरुन जेडीएस भाजपमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
मूर्खपणा कधीही करणार नाही : कुमारस्वामी
The Janata Dal (S), which is a party of Kannadigas with self esteem, will never think of political merger. The party, which is a strong voice of the people, will never display such stupidity. At the most we may extend an issue-based support to the BJP if need be..
— H D Kumaraswamy (@hd_kumaraswamy) December 20, 2020
भाजप-जेडीएस विलिनीकरणाची सर्व चर्चा सुरु असताना, जनता दल सेक्युलरचे प्रमुख कुमारस्वामी यांनी सोशल मीडियावर स्पष्टीकरण दिलं. जेडीएस हा कन्नडीगांचा स्वाभिमान बाळगणारा पक्ष आहे. आम्ही कधीही पक्ष विलिनीकरणाचा विचार करणार नाही. हा पक्ष जनतेचा आवाज आहे, विलिनीकरणासारखा मूर्खपणाचा विचार कधीही करु शकणार नाही. आम्ही गरज भासल्यास लोकांसाठी एखादंवेळी भाजपच्या एखाद्या मुद्द्याचं समर्थन देऊ. मात्र त्याचा अर्थ पक्ष विलीन करु असं नाही.
विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस हाय कमांडने आम्हाला भाजपची बी टीम म्हणून आमची खिल्ली उडवली होती. मात्र प्रत्यक्ष मतदानानंतर काँग्रेस आमच्या दारात आली सोबत सत्ता स्थापनेचं निमंत्रण दिलं. जर आम्ही भाजपची बी टीम असतो, तर आम्ही काँग्रेससोबत कधीच सरकार स्थापन केलं नसतं. भाजपशी आमची कोणतीही जवळीक नाही. एखाद्या मुद्द्याला समर्थन म्हणजे पक्षविलीन नाही. मला इथे स्पष्ट सांगायचं आहे की, दुसर्या पक्षात स्वत:चा पक्ष विलीन करुन आत्महत्या करण्याची परिस्थिती आतापर्यंत आलेली नाही. भविष्यातही अशाप्रकराचा निर्णय घेणार नाही, अशा आषयाचं ट्वीट कुमारस्वामींनी केलं.