माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्या हाती कमळ? अमित शाह आणि जे.पी. नड्डा यांची दिल्लीत घेणार भेट, राजकरणात खळबळ

आज (मंगळवार) अमरिंदर सिंह (Former Punjab Chief Minister Amarinder Singh) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा (J.P.Nadda) यांची दिल्लीत (Delhi) संध्याकाळी भेट घेणार आहेत. पंजाबमध्ये राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. विरोधी पक्ष (Opposition Party) आणि राजकीय विश्लेषकांपासून (Political Analysts) काँग्रेस सुद्धा कॅप्टन सिंह यांना थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

    पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंह (Former Punjab Chief Minister Amarinder Singh)  यांनी काँग्रेसला (Congress) राजीनामा दिल्यानंतर भाजपामध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळावर रंगत आहे. आज (मंगळवार) अमरिंदर सिंह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि भाजपाचे अध्यक्ष जे.पी. नड्डा (J.P.Nadda) यांची दिल्लीत (Delhi) संध्याकाळी भेट घेणार आहेत. पंजाबमध्ये राजकीय चर्चेला उधाण आलं आहे. विरोधी पक्ष (Opposition Party) आणि राजकीय विश्लेषकांपासून (Political Analysts) काँग्रेस सुद्धा कॅप्टन सिंह यांना थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

    अमरिंदर सिंह यांनी नवजोत सिद्धू (Navjot Sidhu) यांच्यासोबत सुरू असलेल्या कलहामुळे मुख्यमंत्री पदावरून राजीनामा दिला आहे. त्यानंतर काँग्रेसच्या हाय कमांडने चरणजीत चन्नी (Charanjit Channi) यांना मुख्यमंत्री पदावर बसवले आहे.

    राजीनामा दिल्यानंतर भाजपलाही सांगितला पर्याय

    जेव्हा कॅप्टनने पदाचा राजीनामा दिला, तेव्हा भाजपमध्ये न येण्याबाबत कोणतेही स्पष्ट उत्तर नव्हते. कॅप्टन म्हणाले की सर्व पर्याय खुले आहेत. ५२ वर्षांचा राजकीय अनुभव आणि साडेनऊ वर्षे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी अनेक मित्र बनवले आहेत. आपल्या समर्थकांशी सल्लामसलत केल्यानंतर ते निर्णय घेतील. पक्षातून राजीनामा देण्याआधीच सिंह हे अमित शाह यांना भेटत होते, पण तेव्हा ते मुख्यमंत्री होते. आता अचानक ते दिल्लीला गेल्यामुळे ते भाजपमध्ये सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.