माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांचा तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश ; भाजपला शह देण्यासाठी टीएमसीचा नवा डाव

भाजपला शह देण्यासाठी टीएमसीच्या ताफ्यात ज्येष्ठ शिलेदारांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या तोंडावरच मोठ्या राजकीय घडामोडी होताना पाहायला मिळत आहेत.

    कोलकाता : माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. भाजपला शह देण्यासाठी टीएमसीच्या ताफ्यात ज्येष्ठ शिलेदारांनी प्रवेश केला आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या तोंडावरच मोठ्या राजकीय घडामोडी होताना पाहायला मिळत आहेत.

    ८३ वर्षीय भाजपाचे माजी नेते आणि केंद्रीय मंत्री सिन्हा यांनी २०१८ मध्ये भाजपाशी राजकीय संबंध तोडून टाकले होते. त्यानंतर ते पीएम नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारविरोधात टीका करत होते. दुसरीकडे सिन्हा यांचं पक्षात प्रवेश करणं हे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी फायदेशीर ठरत आहे. कारण त्यांच्या पक्षातील सुद्धा नेत्यांनी भाजपमध्ये जाऊन बंडखोरी केली.

    आजची भाजपा पहिल्यापेक्षा पूर्णपणे वेगळी : सिन्हा

    कोलकातामध्ये टीएमसीच्या पक्षात सदस्याची नोंद करत सिन्हा यांनी सांगितलं की, आज देश अभूतपूर्व परिस्थितीचा सामना करत आहे. लोकतंत्रची शक्ती त्यांच्या संस्थांमध्ये असते. परंतु आता न्यायपालिका समवेत सर्व संस्था ढासाळल्या आहेत.

    पुढे त्यांनी सांगितलं की, अटलजींच्या काळात भाजपवर सर्व सदस्य आणि नागरिकांचा मोठा विश्वास होता. परंतु आजचं सरकार पाहिलं असता पाडणे आणि जिंकणे अशा प्रकारची वास्तविक परिस्थिती सुरू असल्याची सिन्हा यांनी सांगितली आहे. दरम्यान, अकाली, बीजू जनता दल आणि आता भाजपची साथ सिन्हा यांनी सोडली आहे.