जयपूरमध्ये सामूहिक बलात्कार प्रकरणी चार दोषींना जन्मठेपेची शिक्षा

अलवर (Alwar) येथील स्थानिक कोर्टाने (Court)मंगळवारी ६ ऑक्टोंबर रोजी अलवर येथील थानागाजी (Thanagaji)  येथे एका विवाहित महिलेवर ( in Jaipur gang-rape case ) सामूहिक बलात्कार प्रकरणात दोषी ठरविलेल्या चौघांना जन्मठेपेची शिक्षा ( imprisonment ) सुनावली आहे. या घटनेची व्हिडिओ क्लिप बनवून व्हायरल केलेल्या आरोपीला कोर्टाने माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत पाच वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली.

जयपूर : अलवर (Alwar) येथील स्थानिक कोर्टाने (Court)मंगळवारी ६ ऑक्टोंबर रोजी अलवर येथील थानागाजी (Thanagaji)  येथे एका विवाहित महिलेवर ( in Jaipur gang-rape case ) सामूहिक बलात्कार प्रकरणात दोषी ठरविलेल्या चौघांना जन्मठेपेची शिक्षा ( imprisonment ) सुनावली आहे. या घटनेची व्हिडिओ क्लिप बनवून व्हायरल केलेल्या आरोपीला कोर्टाने माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत पाच वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली.

सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी हंसराज गुर्जर, अशोक गुर्जर, छोटेलाल गुर्जर आणि इंद्रराज गुर्जर यांना न्यायालयाने भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ डी अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आणि सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला. पीडितेच्या वकिलांनी

अलवरमधील पत्रकारांना सांगितले की, पीडितेवर वारंवार बलात्कार करणाऱ्या हंसराजला मृत्यूपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गेल्या वर्षी २६ एप्रिल रोजी अलवरमधील थानागाजी बायपास येथे एका विवाहित महिलेवर तिच्या पतीसमोर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता.

या प्रकरणात मुकेश गुर्जर यांना माहिती व औद्योगिक कायद्यांतर्गत पाच वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. कोर्टाने विविध कलमांखाली आर्थिक दंड ठोठावला आहे, त्यातील रक्कम पीडितेला दिली जाणार आहे.