Corona report of eight lions came positive; Excitement at the Nehru Zoological Park in Hyderabad

या प्राणीसंग्रहालयाने 11 सिंहांचे नमुने करोना चाचणीसाठी पाठविले होते. त्यापैकी चार सिंहांचे नमुने 24 मे रोजी तर उरलेल्या सात सिंहांचे नमुने 29 मे रोजी पाठवले होते. त्यापैकी 9 सिंहांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. या सर्वांवर सध्या उपचार सुरू आहेत.

    चेन्नई : अरिग्नर अन्ना प्राणीसंग्रहालयातल्या चार सिंहांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या जनुकीय संरचनेच्या नमुन्यांच्या चाचणीनंतर हे समोर आले आहे की त्यांना कोरोना विषाणूच्या डेल्टा व्हेरिएंटचा संसर्ग झाला आहे. ही माहिती या प्राणीसंग्रहालयाच्या प्रशासनाकडून देण्यात आली.

    या प्राणीसंग्रहालयाने 11 सिंहांचे नमुने करोना चाचणीसाठी पाठविले होते. त्यापैकी चार सिंहांचे नमुने 24 मे रोजी तर उरलेल्या सात सिंहांचे नमुने 29 मे रोजी पाठवले होते. त्यापैकी 9 सिंहांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. या सर्वांवर सध्या उपचार सुरू आहेत.

    या प्राणीसंग्रहालयाच्या व्यवस्थापकांकडून सांगण्यात आले की, त्यांनी या सिंहांच्या जनुकीय संरचनेचा अहवाल मागवल्यानंतर वैद्यकीय संस्थांनी तो पाठवला. त्यामध्ये असे आढळून आले की चार सिंहांना कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटची लागण झाली आहे. यापूर्वी नऊ वर्षांची सिंहीण नीला आणि पथबंथन नावाचा 12 वर्षांचा सिंह या दोघांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

    हे सुद्धा वाचा