प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्यांना आधी उठाबशा काढायला लावले. त्यानंतर त्यांच्याकडून बेडूक उड्या आणि नागिन डान्स करवून घेतलं. नंतर पोलिसांनी त्यांची समजूत काढून सोडून दिलं. पोलिसांच्या या कारवाईचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

    मुंबई: कोरोनाचा कहर झाला असला तरी अजूनही लोकांची मानसिकतेत बदल होताना दिसत नाही. अनेक नागरिक महामारीचा संकटाला घाबरताना दिसत नाही. विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी करवाई केल्याची अनेक घटना समोरआल्या आहेत. मात्र मध्यप्रदेश पोलिसांनी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अनोखी शिक्षा दिली आहे. यांच्या व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

    मध्य प्रदेशच्या दंतिया आणि भिंड जिल्ह्यांमध्ये संचारबंदीचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांना पोलिसांनी बेडूक उड्या मारण्याची आणि नागिन डान्स करण्याची शिक्षा दिलीय. दंतिया जिल्ह्यातील राजगड चौकावर पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी विनाकारण फिरणाऱ्यांना आधी उठाबशा काढायला लावले. त्यानंतर त्यांच्याकडून बेडूक उड्या आणि नागिन डान्स करवून घेतलं. नंतर पोलिसांनी त्यांची समजूत काढून सोडून दिलं. पोलिसांच्या या कारवाईचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.

    मात्र काही लोक याबाबतचा व्हिडीओ बघून पोलिसांवरही टीका करत आहेत (Viral Video of Police Punishment). प्रकरणी राजगढचे पोलीस अधिकारी वाय एस तोमर यांनी प्रतिक्रिया दिली. ‘आम्ही वारंवार आवाहन करुनही लोक घराबाहेर पडत आहेत. मात्र, ते ऐकत नसल्याने अनेकांना उठाबशा घायला लावल्या. विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांना राम नाव लिहायला लावलं, काही लोकांना कोंबडा बनायला लावलं, काहिंची तर आरती केली तर काहींना जेलमध्ये पाठवलं, अशा शिक्षा आम्ही दिल्या’, असं त्यांनी सांगितलं.