कोरोना व्हायरसनंतर बुरशीचं थैमान ; येलोनंतर आणि आता Cream Fungus…

ब्लॅक (Black Fungus), व्हाइट (White Fungus), येलो फंगसनंतर (Yellow Fungus) आता क्रिम फंगसही (Cream Fungus) दिसून आलं आहे. मध्य प्रदेशच्या क्रिम फंगसचा (Madhya pradesh cream fungus) रुग्ण आढळला आहे.

    भोपाळ: कोरोना महासाथीच्या लाटा, कोरोनाव्हायरसची वेगवेगळी रूपं आणि आता नवनव्या फंगसचंही ( Fungus) थैमान. कोरोनाच्या संकटात फंगसचं नवं संकटही ओढावलं आहे. ज्याप्रमाणे कोरोनाची वेगवेगळी रूपं समोर आली, तशी आता फंगसचीही वेगवेगळी रूपं समोर येत आहेत.

    ब्लॅक (Black Fungus), व्हाइट (White Fungus), येलो फंगसनंतर (Yellow Fungus) आता क्रिम फंगसही (Cream Fungus) दिसून आलं आहे. मध्य प्रदेशच्या क्रिम फंगसचा (Madhya pradesh cream fungus) रुग्ण आढळला आहे.

    मध्य प्रदेशच्या (Madhya pradesh) जबलपरूमध्ये एका रुग्णाला ब्लॅक फंगससह क्रिम फंगसचं इन्फेक्शन झालं आहे. माहितीनुसार राज्यातील हे असं पहिलं प्रकरण आहे. सुभाषचंद्र बोस मेडिकल कॉलेजच्या ईएनटी विभागात या रुग्णावर उपचार सुरू आहेत.