Gangster procession on release from prison; Police sent him back to jail

संपूर्ण गुजरातमध्ये दारूबंदी आहे. पण, अवैधरित्या दारूची राजरोसपणे विक्री होत असते. सूरतमध्ये एक दारू तस्कर शिक्षा भोगून कारागृहाबाहेर आल्यानंतर त्यांच्या साथीदारांनी जोरदार फटाके फोडून वाजत गाजत त्याची मिरवणूक काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मागील महिन्याभरातील ही चौथी घटना आहे. त्यामुळे सुरत पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले जात आहे.

    सूरत : पुण्यातील कुख्यात गुंड गजानन मारणेची जेलमधून सुटल्यानंतर जंगी मिरवणूक काढण्यात आल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी गजा मारणेला पुन्हा जेलची हवा खावी लागली पण याचे लोण आता महाराष्ट्राला लागून असलेल्या गुजरातमध्ये पसरले आहे. सूरतमध्ये कारागृहातून सुटलेल्या गुन्हेगारांचे फटाके फोडून स्वागत करण्यात येत असल्याचे प्रकार समोर आला आहे.

    संपूर्ण गुजरातमध्ये दारूबंदी आहे. पण, अवैधरित्या दारूची राजरोसपणे विक्री होत असते. सूरतमध्ये एक दारू तस्कर शिक्षा भोगून कारागृहाबाहेर आल्यानंतर त्यांच्या साथीदारांनी जोरदार फटाके फोडून वाजत गाजत त्याची मिरवणूक काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मागील महिन्याभरातील ही चौथी घटना आहे. त्यामुळे सुरत पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत केले जात आहे.

    सूरतमधील लिंबायत हा भाग गुन्हेगारांचा अड्डा मानला जातो. या भागात राहणाऱ्या कैलाश पटेल नावाच्या गुन्हेगार हत्याच्या आरोपाखाली जेलमध्ये गेला होता. रविवारी जामिनावर जेलमधून बाहेर आला होता. त्यानंतर त्यांच्या पंटर लोकांनी जेलमधून सुटका झाल्या आनंदात जंगी स्वागत केले.