10 वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार; आरोपींमध्ये 10 आणि 12 वर्षांच्या मुलांचाही समावेश 

हरयाणाच्या रेवाडीमध्ये अवघ्या 10 वर्षांच्या मुलीवर तब्बल सात जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. या सात आरोपींमध्ये केवळ एक आरोपी सज्ञान (18 वर्षांचा) असून इतर सर्व आरोपी अल्पवयीन आहेत. यामध्ये 10 आणि 12 वर्षांच्या मुलांचाही समावेश आहे. इतकेच नाही तर या आरोपींनी बलात्काराचा व्हीडिओही काढला होता.

    रेवाडी : हरयाणाच्या रेवाडीमध्ये अवघ्या 10 वर्षांच्या मुलीवर तब्बल सात जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. या सात आरोपींमध्ये केवळ एक आरोपी सज्ञान (18 वर्षांचा) असून इतर सर्व आरोपी अल्पवयीन आहेत. यामध्ये 10 आणि 12 वर्षांच्या मुलांचाही समावेश आहे. इतकेच नाही तर या आरोपींनी बलात्काराचा व्हीडिओही काढला होता.

    24 मे रोजी काही मुले खेळता-खेळता जवळच असलेल्या एका शाळेच्या इमारतीत गेले. कोरोना संसर्गकाळात शाळा सुरू नसल्याने ही इमारत रिकामी होती. तेथे सात मुलांनी एका 10 वर्षांच्या मुलीवर शारीरिक अत्याचार केले. परंतु, ही घटना तब्बल आठवड्याभरानंतर उघडकीस आली.

    सामूहिक बलात्काराच्या घटनेचा आरोपींनी काढलेला व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ही घटना समोर आली. पीडित मुलीच्या शेजारी राहणाऱ्या रहिवाशांच्या निदर्शनास हा व्हीडिओ आला होता. त्यानंतर त्यांनी पीडित मुलीच्या कुटुंबाला याबद्दल माहिती दिली. त्यानंतर पीडित मुलीच्या कुटुंबाने 9 जून रोजी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.

    हे सुद्धा वाचा