Rapist will get severe punishment in Pakistan, rapist will be made

क्रुतेची परिसीमा गाठणारी धक्कादायक घटना मध्यप्रदेशातील उमरियामध्ये घडली आहे. नऊ नराधम तब्बल तीन दिवस एका १३ वर्षांच्या मुलीवर गँगरेप करत होते. या प्रकरणी पोलिसांनी सात आरोपींना ताब्यात घेतले आहे.

उमरिया : क्रुतेची परिसीमा गाठणारी धक्कादायक घटना मध्यप्रदेशातील उमरियामध्ये घडली आहे. नऊ नराधम तब्बल तीन दिवस एका १३ वर्षांच्या मुलीवर गँगरेप करत होते. या प्रकरणी पोलिसांनी सात आरोपींना ताब्यात घेतले आहे.

पीडित मुलगी घरातील काही वस्तु आणण्यासाठी बाजारात गेली असती आरोपींनी तिला आपल सावज केल. ११ जानेवारीपासून ही मुलगी बेपत्ता होती.

दोघा आरोपींनी तिला जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्या दिवशी तिला एका ढाब्यावर ठेवलं आणि त्यावेळी इतरही आरोपी पोहचले होते. त्यांनीदेखील मुलीवर बलात्कार केला.

दुसऱ्या दिवशी मुलीने घरी जाण्यासाठी विनवण्या केल्या. आरोपींनी एका ड्रायव्हरसोबत तिला ट्रकमध्ये बसवलं. यावेळी ट्रक चालकानेही रस्त्यात जबरदस्ती करत, तिला मध्येच रस्त्यात सोडून दिलं. मुलीने पुन्हा उमरिया जाण्यासाठी ट्रक चालकाकडे लिफ्ट मागितली, त्याने देखील जबरदस्ती केली आणि नंतर उमरियाजवळ सोडलं. मुलीने दिलेल्या माहितीनंतर, पोलिसांनी सात जणांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.