म्हैसुरमध्ये भयानक प्रकार, दरोडेखोरांकडून विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार – प्रियकरावर दगडाने हल्ला

म्हैसूरमध्ये सामूहिक बलात्काराची(Gang Rape In Mysore) एक भयानक घटना समोर आली आहे. एका विद्यार्थिनीवर(student Raped) सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे.

    म्हैसुर : कर्नाटकमधील(Karnatak) म्हैसूरमध्ये सामूहिक बलात्काराची(Gang Rape In Mysore) एक भयानक घटना समोर आली आहे. एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. तसेच तिच्या प्रियकराला पैसे न दिल्याबद्दल मारहाण करण्यात आली. ही घटना मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास मुलगी प्रियकरासोबत घरी येत असताना घडली.

    म्हैसूरमधील चामुंडी डोंगर परिसरात विद्यार्थिनी प्रियकरासोबत फिरायला गेली होती. तिथे काही लोकांनी दोघांना घेरले आणि त्यांच्याकडून पैसे मागू लागले. यानंतर आरोपी पीडितेला आणि तिच्या मित्राला त्यांनी निर्जन ठिकाणी नेले. यानंतर दोघांनी मुलीवर लैंगिक अत्याचार केले आणि प्रियकराला दगडाने मारून त्याला जखमी केले. ते प्रियकराकडे पैशांची मागणी करत होते. पीडित महाविद्यालयीन विद्यार्थिनी उत्तर प्रदेशातून म्हैसूरला अभ्यासासाठी आली होती.

    या प्रकरणातील आरोपी अजुनही सापडलेले नाहीत. पीडितेला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.आरोपींचा शोध सुरु आहे.