Ganga shores of liquor; Police raid liquor mafia in Bihar

होळी जवळ येताच बिहारमध्ये दारूमाफियांवर पोलिसांनी लगाम कसणे सुरू केले आहे. पाटणा आणि सोनपूर येथे पोलिसांनी लाखोंचे मद्यही जप्त केले आहे. हे सर्व मद्य वाळूमध्ये लपविण्यात आले होते. दारू माफियांनी पीरबहोर आणि सोनपूर भागात गंगा नदीकिनारी वाळू आणि शेतात मद्याची खेपच पोत्यांमध्ये लपवून ठेवली होती. परंतु पीरबहोर येथील पोलिसांना याची गुप्त माहिती मिळताच त्यांनी धाड टाकली आणि लाखोंचे मद्य जप्त केले.

  पाटणा : होळी जवळ येताच बिहारमध्ये दारूमाफियांवर पोलिसांनी लगाम कसणे सुरू केले आहे. पाटणा आणि सोनपूर येथे पोलिसांनी लाखोंचे मद्यही जप्त केले आहे. हे सर्व मद्य वाळूमध्ये लपविण्यात आले होते. दारू माफियांनी पीरबहोर आणि सोनपूर भागात गंगा नदीकिनारी वाळू आणि शेतात मद्याची खेपच पोत्यांमध्ये लपवून ठेवली होती. परंतु पीरबहोर येथील पोलिसांना याची गुप्त माहिती मिळताच त्यांनी धाड टाकली आणि लाखोंचे मद्य जप्त केले.

  वाळू उपसताच पोलिसही आश्चर्यचकित

  गंगा किनारी दाखल झालेल्या पोलिसांनी जेव्हा वाळू उपसली तेव्हा विदेशी मद्य पोत्यामध्ये ठेवलेले त्यांना आढळले. पोलिसांनी येथून 25 पोत्यातून 520 विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. डीसीपी सुरेश प्रसाद आणि पोलिस निरीक्षक रिजवान अहमद यांना एनआयटी घाटसमोरील सोनपूर भागात वाळू आणि गंगा नदीच्या किनारी असलेल्या शेतांमध्ये विदेशी मद्याची खेप असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी नावेद्वारे गंगा पार केली आणि दोन तास शोधमोहीम राबविली.

  होळीपूर्वीच उतरविली नशा

  या मद्याचा नावेद्वारेच पुरवठा केला जाणार होता अशी माहिती पोलिसांनी दिली. होळी उत्सव पाहू जाता दारू माफियांनी विदेशी दारूचा साठा करून ठेवला होता. त्यासाठीच गंगा किनारी दारूची खेप वाळूखाली आणि शेजारील शेतामध्ये लपवून ठेवली होती. नावेतून पुरवठा झाल्यानंतर हे मद्य बाईक वा लहान कारद्वारे लहान लहान विक्रेत्यांपर्यंत पोहोचविले जाणार होते परंतु पोलिसांनी माफियांच्या मनसुब्यांवरच पाणी फेरले आहे.

  छापामार कारवाई सुरू

  दुसरीकडे, दारूबंदी असलेल्या बिहारमध्ये आता अबकारी विभागाने छापामार कारवाई सुरू केली आहे. जवळपास 4100 लीटर देशी दारू जप्त केली असून दोन डझन देशी दारूच्या भट्ट्याही उद्ध्वस्त केल्या आहेत. या कारवाईमुळे दारू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे. दारूबंदी कायदा लागू होऊन पाच वर्षांचा कालावधी लोटला असला तरी राज्यात दारू माफियांच्या कारवाया सुरूच असल्याचे यातून दिसून येते.