Gas leak in IFFCO, 2 killed, 15 seriously injured

गॅस गळती झाली तेव्हा १०० कर्मचारी या प्लांटमध्ये काम करत होते. अचानक गॅस गळतीनंतर कंपनीत गोंधळ उडाला. बर्‍याच कर्मचार्‍यांनी अमोनियाच्या विळख्यात येऊन तेथेच पडले त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. लवकरच, वैद्यकीय पथकाने सर्वांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

उत्तर प्रदेश : युपीच्या इफ्को प्लांट गॅस (Gas leak in IFFCO) गळती प्रकल्पात मोठा अपघात घडला आहे. यूरिया बनवणाऱ्या प्लांटमध्ये रात्री उशिरा अमोनिया गॅस गळतीमुळे खळबळ उडाली होती. या अपघातात दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. गॅस गळतीमुळे १२ कामगार आजारी पडले आहेत. या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गॅस गळतीमुळे बळी पडलेल्यांपैकी १५ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. या अपघातात प्लांटचे सहाय्यक व्यवस्थापक बीपी सिंह आणि उपव्यवस्थापक अभिनंदन यांचा मृत्यू झाला.

नाईट शिफ्टमध्ये काम करत होते १०० कामगार

जेव्हा गॅस गळती झाली तेव्हा १०० कर्मचारी या प्लांटमध्ये काम करत होते. अचानक गॅस गळतीनंतर कंपनीत गोंधळ उडाला. बर्‍याच कर्मचार्‍यांनी अमोनियाच्या विळख्यात येऊन तेथेच पडले त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला. लवकरच, वैद्यकीय पथकाने सर्वांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

आशिया स्तराची युरिया उत्पादन करणारी कंपनी

इफ्को या प्रयागराजच्या जिल्हा दंडाधिकारी कार्यालयापासून अवघ्या ४० कि.मी. अंतरावर फुलपूर येथे इफ्को (इंडियन फार्मर्स अँड फर्टिलायझर कोऑपरेटिव्ह लिमिटेड) चा प्लांट आहे. ही कंपनी आशियामधील निवडक कंपन्यांमध्ये मोजली जाते. मंगळवारी रात्री उशिरा बाराच्या सुमारास या कंपनीत काम सुरु होते. त्याच वेळी, अमोनिया गॅस गळती होऊ लागली. सुमारे १०० कर्मचारी आणि बरेच अधिकारी कंपनीतील रात्रीच्या शिफ्टमध्ये ड्युटीवर होते.

पंप गळतीमुळे अपघाताची भीती व्यक्त करण्यात आली आहे

घटनेचे गांभीर्य पाहून जिल्हा प्रशासनाचे उच्च अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि अपघाताच्या चौकशीला सुरुवात केली. गळतीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. तथापि, कंपनीच्या पंपातून गळतीमुळे अपघात झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. या घटनेतही दुर्लक्ष झाल्याची चर्चा आहे. अधिकारी सध्या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत. इफ्कोचे पीआरओ (जनसंपर्क अधिकारी) विश्वजित यांनी दोन अधिकऱ्यांच्या मृत्यूची माहिती दिली आहे.