cash

जयपूर विकास प्राधिकरणात (जेडीए )अभियंता असलेला निर्मल गोयलच्या घरी एसीबीच्या अधिकाऱ्यांना त्याच्या उत्पन्नाच्या 1450 टक्के अधिक संपत्ती सापडली आहे. जेडीएमध्ये अभियंता असलेल्या निर्मल गोयलचे वेतन दीड लाख रुपये आहे. मात्र, जयपूरमधील मोक्याच्या ठिकाणी एका वसाहतीत त्याची चार आलिशान घरे आहेत. अधिकाऱ्यांना अभियंत्याच्या फार्म हाऊसमध्ये 3 लाख 87 हजारांची रोकड, 30 किलो सोने, 245 युरो, 2 हजार डॉलर, मर्सिडिझसह पाच महागड्या कार आढळून आल्या आहेत. तीन बँकांमध्ये अभियंत्याचे लॉकरदेखील आहेत. ते अद्याप उघडायचे आहेत.

    जयपूर : राजस्थानमध्ये सध्या भ्रष्ट अधिकाऱ्याविरोधात मोठी कारवाई करण्यात येत आहेत. या कारवाई अंतर्गत भ्रष्टाचारविरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. जयपूर, जोधपूर आणि चित्तोढगडमध्ये 3 अधिकाऱ्यांशी संबंधित 14 ठिकाणी छापे टाकण्यात आले. त्यांच्या या कारवाईमुळे आणखी मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

    जयपूर विकास प्राधिकरणात (जेडीए )अभियंता असलेला निर्मल गोयलच्या घरी एसीबीच्या अधिकाऱ्यांना त्याच्या उत्पन्नाच्या 1450 टक्के अधिक संपत्ती सापडली आहे. जेडीएमध्ये अभियंता असलेल्या निर्मल गोयलचे वेतन दीड लाख रुपये आहे. मात्र, जयपूरमधील मोक्याच्या ठिकाणी एका वसाहतीत त्याची चार आलिशान घरे आहेत. अधिकाऱ्यांना अभियंत्याच्या फार्म हाऊसमध्ये 3 लाख 87 हजारांची रोकड, 30 किलो सोने, 245 युरो, 2 हजार डॉलर, मर्सिडिझसह पाच महागड्या कार आढळून आल्या आहेत. तीन बँकांमध्ये अभियंत्याचे लॉकरदेखील आहेत. ते अद्याप उघडायचे आहेत.

    चित्तौढगडमध्ये जिल्हा परिवहन अधिकारी मनीष शर्माजवळ दोन कोटींच्या गुंतवणुकीची कागदपत्रे सापडली आहेत. त्याच्या सदनिकेत एक लाखाची रोकड आणि परदेश प्रवासाची कागदपत्रे आढळून आली आहेत. अधिकाऱ्यांनी त्याच्या घराजवळून महागड्या दुचाकी आणि कारदेखील ताब्यात घेतल्या आहेत. जोधपूरमध्ये निरीक्षक प्रदीप शर्माच्या घरावर भ्रष्टाचार विरोधी विभागाच्या पथकानेछापा टाकला. शर्माच्या भोपाळ, बिकानेरमधील मालमत्तावरदेखील छापे टाकण्यात आले. त्यातून साडे चार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची माहिती समोर आली. ही संपत्ती त्याच्या उत्पन्नाच्या 333 टक्के अधिक आहे. सूरसागर ठाण्यात तैनात असलेल्या निरीक्षक प्रदीप शर्माची जोधपूर, भोपाळमध्ये जमीन असून त्याच्या मालकीची एक शाळा आणि तीन बसेसदेखील आहेत.